Daily Numerology: अंकशास्त्रानुसार 26 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? 1 ते 9 मूलांकाचे नशीब

Last Updated:

Daily Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 ऑगस्ट 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्यासाठी आज मंगळवारचा दिवस संमिश्र आहे. कामात तुमची प्रगती होईल. तुम्ही करीत असलेल्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या इच्छेनुसार बदल दिसतील. आर्थिक संपत्तीत वाढ होईल. प्रेमाच्या बाबतीत मात्र हा काळ थोडा अवघड आहे. परस्पर तणाव वाढू शकतो, काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी वाईट बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
तुमच्यासाठी आजचा मंगळवारचा दिवसच चांगला आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराशी रोमँटिक संबंध राहतील. मन प्रसन्न राहील. ऑफिसमध्ये काम करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कामाकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी स्थिती हळूहळू सुधारेल.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
मंगळवार तुमच्यासाठी अनुकूल आहे. संपत्ती वाढीसाठी शुभ संधी निर्माण होतील. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. लव्ह लाईफमध्ये भावनिक निराशा वाढेल. नोकरीमध्ये कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकते, सावध राहा. तुमचे मन प्रसन्न राहील.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामात तुमची प्रगती होईल, मानसन्मान वाढेल. आर्थिक लाभासाठीही वेळ उत्तम असून गुंतवणुकीतून लाभ होईल. प्रेमाच्या बाबतीत प्रेमसंबंधांमध्ये निराशा वाढेल. मानसिक त्रास होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटेल.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आजचा मंगळवार आर्थिक बाबींसाठी अतिशय आनंददायी आहे. आर्थिक लाभ चांगला होईल. प्रेम संबंधांमध्ये अंतर वाढेल. काही मुद्द्यांवरून तणाव निर्माण होऊ शकतो, काळजी घ्या. ऑफिसमध्ये उत्साहाच्या भरात अचानक कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी तुमचं मन प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारचा दिवस सामान्य आहे. ऑफिसमध्ये प्रगती होईल. तुम्ही काम करीत असलेल्या प्रोजेक्टमध्ये यश येईल. प्रेमाच्या बाबतीत वेळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचं नातं घट्ट होईल. आर्थिक बाबतीत चिंता वाढू शकते. मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल होईल.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवार दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, प्रेमाच्या बाबतीत काळ अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सहवासात निवांत वेळ घालवू शकता, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. आर्थिक लाभही चांगला होईल. तुम्ही पार्टी मूडमध्ये असाल. ऑफिसमध्ये तुम्ही केलेले प्रयत्न जीवनात चांगले क्षण घेऊन येतील. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल राहील.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवार तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमध्ये प्रगती होईल, आदर वाढेल. तुमच्यासाठी आर्थिक लाभाची परिस्थिती चांगली असेल. नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल. लव्ह लाइफ रोमँटिक असेल. आठवड्याच्या शेवटी संयमानं काम केल्यास प्रगती होईल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवार तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. कामात प्रगती होईल. तेथे वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. प्रेम संबंधात मात्र तुम्हाला एकटेपणा जाणवेल. तुमचं मन उदास राहील. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होऊ शकतात, काळजी घ्या. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी तुम्ही लक्ष केंद्रित करून पुढे गेल्यास तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Daily Numerology: अंकशास्त्रानुसार 26 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? 1 ते 9 मूलांकाचे नशीब
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement