Ganesh Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..! दुपारनंतर विसर्जनासाठी हा सर्वात शुभ कालावधी चुकवू नका

Last Updated:

Ganesh Visarjan 2025 on Anant Chaturdashi: गणेश विसर्जन ही केवळ परंपरा नसून शास्त्रीय दृष्टिकोनातून, देवतेच्या मूर्तीचे पंचमहाभूतांमध्ये पुनर्विलय होणंही आहे. म्हणून या गोष्टीला शुभ काळाचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जन केल्याने शुभ परिणाम मिळतात, बाप्पाचा आशीर्वादही मिळतो.

News18
News18
मुंबई : लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आला आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन होईल. या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जन ही केवळ परंपरा नसून शास्त्रीय दृष्टिकोनातून, देवतेच्या मूर्तीचे पंचमहाभूतांमध्ये पुनर्विलय होणंही आहे. म्हणून या गोष्टीला शुभ काळाचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जन केल्याने शुभ परिणाम मिळतात, बाप्पाचा आशीर्वादही मिळतो. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त सकाळी 7:36 पासून सुरू झाला असून संपूर्ण दिवसात विसर्जनाचे फक्त 3 मुहूर्त आहेत.
शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जन -
शास्त्रानुसार, देवपूजा, प्रतिष्ठा आणि विसर्जन यांसारखी धार्मिक कामे शुभ मुहूर्तावर केली तरच पूर्ण फळे मिळतात. शुभ मुहूर्तावर केलेली सर्व कृत्ये अनेक दोष कमी करतात, शिवाय गणरायाचे आशिर्वादही मिळतात. शुभ मुहूर्तावर ग्रहांची सकारात्मक ऊर्जा प्रबळ असते, त्यामुळे पूजा आणि विसर्जनाचे पुण्य अनेक पटींनी वाढते. गणपती स्वतः विघ्नांचा नाश करणारा आहे, म्हणून अशुभ मुहूर्तावर त्याचे विसर्जन करणे योग्य मानले जात नाही. शुभ मुहूर्तावर गणरायाचे विसर्जन केल्यानं समाजासाठी आनंद, शांती आणि समृद्धी आणते.
advertisement
गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त 2025
सकाळची वेळ - 07:36 ते 09:10
दुपारची वेळ - 12:19 ते 05:02
संध्याकाळची वेळ - 06:37 ते 08:02
गणपती विसर्जन मंत्र -
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
गणपती विसर्जनाची संपूर्ण पद्धत
- विसर्जन करण्यापूर्वी चांगली स्वच्छता करून घ्या, सर्वत्र गंगाजल शिंपडा.
advertisement
- बाप्पाला नैवेद्य (मोदक, फळे, मिठाई) अर्पण करा आणि धूप, दिवा आणि फुले अर्पण करून षोडशोपचार पूजा करा.
- सर्वांनी एकत्र आरती करावी, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करा.
- शेवटी गणपतीला वंदन करा आणि ही प्रार्थना म्हणा -
गजाननं भूतगणादि सेवितं, कपित्थ जम्बू फलचारु भक्षणम्। उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपंकजम्॥
advertisement
विसर्जन करताना मूर्ती 5 वेळा भिजवून हळूहळू पाण्यात उतरवा.
शेवटी हात जोडून बाप्पाला संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ganesh Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..! दुपारनंतर विसर्जनासाठी हा सर्वात शुभ कालावधी चुकवू नका
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement