advertisement

HastRekha: तळहातावर याठिकाणी Y चिन्ह तयार होत असेल तर करोडपतींच्या यादीत याल; नशीब पालटणार

Last Updated:

Astrology Marathi: तळहातावर 'Y' चं निशाण एका दुधारी तलवारीसारखं असतं. जर हे निशाण चंद्र पर्वताकडे जात असेल, तर ते तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतं. पण, जर ते फक्त जीवनरेषेला तोडत असेल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत..

News18
News18
मुंबई : हातावरच्या रेषा आपल्या भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सागंतात असं मानलं जातं. हातावर उमटणाऱ्या खुणा अनेकदा लकी ठरतात. हस्तरेखा शास्त्रात आपल्या हातावरच्या रेषा म्हणजे फक्त रेषा नसून त्या भविष्यातल्या खुणा असतात. अनेकदा या रेषांच्या मिळण्यामुळे इंग्रजी अक्षर 'Y' सारखा आकार तयार होतो. हस्तरेखा तज्ज्ञांच्या मते, 'Y' चं हे निशाण माणसाच्या आयुष्यातलं धन, प्रसिद्धी आणि आरोग्याशी संबंधित मोठे रहस्य उलगडतं.
तळहातावर 'Y' चं निशाण एका दुधारी तलवारीसारखं असतं. जर हे निशाण चंद्र पर्वताकडे जात असेल, तर ते तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतं. पण, जर ते फक्त जीवनरेषेला तोडत असेल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत आणि निर्णयांबाबत फार सावध राहण्याची गरज असते. बघूया हातावरचं हे 'Y' चं निशाण कधी नशीब चमकवतं आणि कधी अडचणींचे संकेत देतं.
advertisement
'Y' चं निशाण: वरदान की शाप?
हस्तरेखा शास्त्रानुसार 'Y' चं फळ हे ते निशाण हाताच्या कोणत्या भागावर आणि कोणत्या रेषांच्या संगमातून बनतंय, यावर अवलंबून असतं. हे निशाण तुम्हाला अफाट यशही देऊ शकतं किंवा संघर्षाचं कारणही बनू शकतं.
जेव्हा 'Y' असतो भाग्याचा संकेत - तुमच्या जीवनरेषेतून एखादी शाखा फुटून चंद्र पर्वताकडे जात असेल आणि तिथे 'Y' असा आकार बनत असेल, तर ते लय शुभ मानलं जातं. अशी माणसं जन्मजात 'बिझनेसमन' असतात. त्यांचा व्यापार फक्त वाढतोच असं नाही, तर तो सातासमुद्रापार म्हणजे परदेशातही पसरतो. हे निशाण परदेशात स्थायिक होण्याचे किंवा तिथून पैसे कमावण्याचे संकेत देतं. असे लोक समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि आरामात आयुष्य जगतात.
advertisement
कधी मानलं जातं अशुभ?
हातावरचं प्रत्येक 'Y' चं निशाण चांगलं नसतं. जर एखादी छोटी आणि कमकुवत रेषा जीवनरेषेतून बाहेर येऊन नुसता 'Y' सारखा कट मारत असेल, तर तो एक नकारात्मक संकेत असू शकतो. यामुळे माणसाची जीवनशक्ती कमी होते असं मानलं जातं. अशा लोकांना वारंवार आजारपण किंवा शारीरिक कमजोरी जाणवू शकते. जर हे निशाण जीवनरेषेला कापत असेल, तर ते ऊर्जेची कमतरता आणि आयुष्यातला मोठा संघर्ष दाखवतं. अशी माणसं मानसिकरीत्या लवकर थकतात.
advertisement
मनगट आणि जीवनरेषेच्या मध्ये 'Y' - जर हाताच्या खालच्या भागात म्हणजे मनगट (मणिबंध) आणि जीवनरेषेच्या जवळ 'Y' चं स्पष्ट चिन्ह बनत असेल, तर त्याचा अर्थ असा की माणसाला सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागेल, पण त्यानंतर त्याला अफाट यश मिळेल. अशी माणसं स्वतःच्या मेहनतीवर शून्यातून विश्व निर्माण करतात, असे मानले जाते.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
HastRekha: तळहातावर याठिकाणी Y चिन्ह तयार होत असेल तर करोडपतींच्या यादीत याल; नशीब पालटणार
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement