Ekadashi 2025: चातुर्मासासोबत घरातील अशुभताही होईल नष्ट; कार्तिकी एकादशीला केलेले हे उपाय फळ देतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात, म्हणून याला 'प्रबोधिनी एकादशी' किंवा 'देवोत्थानी एकादशी' असंही म्हणतात. या एकादशीसोबतच अशुभ चातुर्मासाचा काळ संपत असल्यानं आपल्या घरातून अशुभता नष्ट करण्यासाठी काही विशेष ठिकाणी दिवे लावावे.
मुंबई : कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. हिंदू धर्मात, विशेषतः वैष्णव संप्रदायात आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात या एकादशीला आषाढी एकादशीइतकेच महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक कारण म्हणजे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून (झोपेतून) जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात, ज्याला 'देवशयनी एकादशी' म्हणतात. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात, म्हणून याला 'प्रबोधिनी एकादशी' किंवा 'देवोत्थानी एकादशी' असंही म्हणतात. या एकादशीसोबतच अशुभ चातुर्मासाचा काळ संपत असल्यानं आपल्या घरातून अशुभता नष्ट करण्यासाठी काही विशेष ठिकाणी दिवे लावावे.
प्रबोधिनी एकादशीला कुठे दिवे लावायचे -
तुळशीच्या झाडाजवळ पाच दिवे लावा - आर्थिक लाभ मिळविण्यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, प्रबोधिनी एकादशीला संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ पाच तुपाचे दिवे लावा.
घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा - प्रबोधिनी कार्तिकी एकादशीला पती-पत्नीने मिळून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसाठी घरातील देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहील.
advertisement
घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा - कार्तिकी एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने सर्व त्रास दूर होतात आणि धन प्राप्त होते, असे मानले जाते.
दारात दिवा लावा - प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते.
advertisement
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा - प्रबोधिनी एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्यानं ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकाच वेळी पूर्ण आशीर्वाद मिळतील आणि जीवनातील संकटे दूर होतील.
कार्तिकी एकादशीला तुळशीचे उपाय -
advertisement
तुळशीची पूजा - कार्तिकी एकादशीला तुळशीची पूजा करा आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा. असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला धन-समृद्धीचा आशीर्वाद देईल. पण, एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये.
श्री हरी विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा - कार्तिकी एकादशीला आदल्या दिवशी तोडलेली तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करावीत, बनवलेल्या नैवेद्यात ती समाविष्ट करा. यामुळे श्रीहरी प्रसन्न होऊन तुमच्या घराला आशीर्वाद देतील.
advertisement
लाल कापडात तुळशीची पानं घालून - आर्थिक लाभासाठी कार्तिकी एकादशीच्या एक दिवस आधी तुळशीची पाने तोडून लाल कापडात बांधा. एकादशीच्या पूजेदरम्यान ती श्री हरीला अर्पण करा. पूजा केल्यानंतर लाल कापडात बांधलेली पाने तुमच्या पर्समध्ये किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. त्यानं कुटुंबात आनंद नांदेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ekadashi 2025: चातुर्मासासोबत घरातील अशुभताही होईल नष्ट; कार्तिकी एकादशीला केलेले हे उपाय फळ देतात