Shravan 2025: श्रावण महिना सार्थकी लागेल! मनोभावे शंकराच्या 108 नावांचा असा करावा जप
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: श्रावणामध्ये शंकराच्या १०८ नावांचा जप करणं खूप फलदायी मानले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
मुंबई : श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र काळांपैकी एक मानला जातो. हा महिना पूर्णपणे महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. श्रावण महिन्यात लोक उत्स्फुर्तपणे मंदिरांना भेट देऊन देवाची पूजा करतात. श्रावणात प्रत्येक सोमवारला श्रावण सोमवार असे विशेष महत्त्व आहे. या काळात भाविक उपवास करतात, शिव मंदिरात जल अर्पण करतात आणि 'ओम नमः शिवाय' असा जप करतात. श्रावणामध्ये शंकराच्या १०८ नावांचा जप करणं देखील खूप फलदायी मानले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
शंकराच्या १०८ नावांचा जप का करावा?
शंकराच्या १०८ नावांचा जप केल्यानं मन शांत होते, मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि शांती टिकून राहते. श्रावण महिन्यात पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हा जप केला तर तो विशेष फलदायी ठरतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शिवाय १०८ या संख्येचे विशेष महत्त्व आहे. ही साधीसुधी संख्या नसून त्यात आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक आहे. आपल्या शरीरात १०८ ऊर्जा केंद्रे आहेत आणि शंकराच्या या नावांनी ही सर्व केंद्रे सक्रिय केली जाऊ शकतात.
advertisement
हा जप कोण करू शकते?
- कोणतीही स्त्री असो वा पुरुष, वयाची अट नाही.
- जर विवाहयोग्य मुली सोमवारी उपवास करून या नावांचा जप करत असतील तर त्यांना चांगला जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते.
- ही नावे मानसिक ताणतणाव किंवा कोणत्याही मोठ्या समस्येशी झुंजणाऱ्यांना मानसिक शांती देऊ शकतात.
जप करण्याची योग्य पद्धत
१. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
advertisement
२. शंकराच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसा.
३. रुद्राक्षाची माळ घ्या आणि १०८ वेळा नावे जप करा.
४. माळ नसेल तरीही नावे वाचा किंवा म्हणा.
५. पाणी, बेलपत्र, धतूरा आणि दुधाने शिवलिंगाची पूजा करा.
नामजपाची वेळ -
-सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते.
-घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजास्थळी बसून जप करा.
-शक्य नसल्यास, प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी ही नावे तुमच्या मनात घेता येतील.
advertisement
शंभू महादेवाची 108 नावे -
ॐ भोलेनाथ नमः
ॐ कैलाश पति नमः
ॐ भूतनाथ नमः
ॐ नंदराज नमः
ॐ नन्दी की सवारी नमः
ॐ ज्योतिलिंग नमः
ॐ महाकाल नमः
ॐ रुद्रनाथ नमः
ॐ भीमशंकर नमः
ॐ नटराज नमः
advertisement
ॐ प्रलेयन्कार नमः
ॐ चंद्रमोली नमः
ॐ डमरूधारी नमः
ॐ चंद्रधारी नमः
ॐ मलिकार्जुन नमः
ॐ भीमेश्वर नमः
ॐ विषधारी नमः
ॐ बम भोले नमः
ॐ ओंकार स्वामी नमः
ॐ ओंकारेश्वर नमः
ॐ शंकर त्रिशूलधारी नमः
ॐ विश्वनाथ नमः
ॐ अनादिदेव नमः
ॐ उमापति नमः
ॐ गोरापति नमः
ॐ गणपिता नमः
advertisement
ॐ भोले बाबा नमः
ॐ शिवजी नमः
ॐ शम्भु नमः
ॐ नीलकंठ नमः
ॐ महाकालेश्वर नमः
ॐ त्रिपुरारी नमः
ॐ त्रिलोकनाथ नमः
ॐ त्रिनेत्रधारी नमः
ॐ बर्फानी बाबा नमः
ॐ जगतपिता नमः
ॐ मृत्युन्जन नमः
ॐ नागधारी नमः
ॐ रामेश्वर नमः
ॐ लंकेश्वर नमः
ॐ अमरनाथ नमः
ॐ केदारनाथ नमः
advertisement
ॐ मंगलेश्वर नमः
ॐ अर्धनारीश्वर नमः
ॐ नागार्जुन नमः
ॐ जटाधारी नमः
ॐ नीलेश्वर नमः
ॐ गलसर्पमाला नमः
ॐ दीनानाथ नमः
ॐ सोमनाथ नमः
ॐ जोगी नमः
ॐ भंडारी बाबा नमः
ॐ बमलेहरी नमः
ॐ गोरीशंकर नमः
ॐ शिवाकांत नमः
ॐ महेश्वराए नमः
ॐ महेश नमः
ॐ ओलोकानाथ नमः
ॐ आदिनाथ नमः
ॐ देवदेवेश्वर नमः
ॐ प्राणनाथ नमः
ॐ शिवम् नमः
ॐ महादानी नमः
ॐ शिवदानी नमः
ॐ संकटहारी नमः
ॐ महेश्वर नमः
ॐ रुंडमालाधारी नमः
ॐ जगपालनकर्ता नमः
ॐ पशुपति नमः
ॐ संगमेश्वर नमः
ॐ दक्षेश्वर नमः
ॐ घ्रेनश्वर नमः
ॐ मणिमहेश नमः
ॐ अनादी नमः
ॐ अमर नमः
ॐ आशुतोष महाराज नमः
ॐ विलवकेश्वर नमः
ॐ अचलेश्वर नमः
ॐ अभयंकर नमः
ॐ पातालेश्वर नमः
ॐ धूधेश्वर नमः
ॐ सर्पधारी नमः
ॐ त्रिलोकिनरेश नमः
ॐ हठ योगी नमः
ॐ विश्लेश्वर नमः
ॐ नागाधिराज नमः
ॐ सर्वेश्वर नमः
ॐ उमाकांत नमः
ॐ बाबा चंद्रेश्वर नमः
ॐ त्रिकालदर्शी नमः
ॐ त्रिलोकी स्वामी नमः
ॐ महादेव नमः
ॐ गढ़शंकर नमः
ॐ मुक्तेश्वर नमः
ॐ नटेषर नमः
ॐ गिरजापति नमः
ॐ भद्रेश्वर नमः
ॐ त्रिपुनाशक नमः
ॐ निर्जेश्वर नमः
ॐ किरातेश्वर नमः
ॐ जागेश्वर नमः
ॐ अबधूतपति नमः
ॐ भीलपति नमः
ॐ जितनाथ नमः
ॐ वृषेश्वर नमः
ॐ भूतेश्वर नमः
ॐ बैजूनाथ नमः
ॐ नागेश्वर नमः
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2025 7:19 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण महिना सार्थकी लागेल! मनोभावे शंकराच्या 108 नावांचा असा करावा जप


