मकर संक्रांतीला 3:13 मिनिटांनी नशीब पालटणार, कोणाला मिळणार खुशखबरी, तर कुणाला राहावं लागणार सावध?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला 'मकर संक्रांत' म्हटले जाते.
Makar Sankranti : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला 'मकर संक्रांत' म्हटले जाते. यंदा बुधवारी, 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी सूर्याचे हे राशी परिवर्तन होणार आहे. याच दिवसापासून 'उत्तरायण' सुरू होते, ज्याला देवांचा दिवस मानले जाते. यावर्षी मकर संक्रांतीला षटतिला एकादशीचा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. सूर्य आणि शनीच्या या विशेष स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाची बरसात होईल, तर काहींना सावधानता बाळगावी लागेल.
मेष
सूर्याचे हे गोचर तुमच्या दहाव्या स्थानी होणार आहे. नोकरीत बढती आणि पगारवाढीचे प्रबळ योग आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि वडिलांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
वृषभ
सूर्य तुमच्या नवव्या स्थानी प्रवेश करेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. परदेश प्रवासाचे योग येतील आणि धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
advertisement
सिंह
तुमचा राशीस्वामी सूर्य सहाव्या स्थानी प्रवेश करणार आहे. यामुळे तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल. जुन्या आजारांपासून सुटका होईल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश प्राप्त होईल.
वृश्चिक
तिसऱ्या स्थानी होणारे सूर्याचे गोचर तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवेल. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या पराक्रमामुळे कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल.
advertisement
'या' राशींनी राहावे अत्यंत सावध
कर्क
सूर्याचे गोचर तुमच्या सातव्या स्थानी होणार आहे. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत बोलताना संयम पाळा. भागीदारीच्या व्यवसायात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.
कुंभ
सूर्य तुमच्या बाराव्या स्थानी प्रवेश करेल. यामुळे अनावश्यक खर्चात प्रचंड वाढ होईल. डोळ्यांच्या किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. या काळात कोर्ट-कचेरीच्या कामांपासून दूर राहणेच हिताचे ठरेल.
advertisement
मीन
अकराव्या स्थानी सूर्य असला तरी शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला पैशांच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल. कोणालाही मोठे कर्ज देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 6:14 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
मकर संक्रांतीला 3:13 मिनिटांनी नशीब पालटणार, कोणाला मिळणार खुशखबरी, तर कुणाला राहावं लागणार सावध?









