Shravan 2025: श्रावण महिन्यात साप दिसणं शुभ म्हणावं की आणखी काही? अशा गोष्टींचा तो संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: प्राचीन काळापासून हिंदू धर्मात सापांची पूजा केली जात आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि ग्रंथांमध्ये सापांना पवित्र प्राणी देखील मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, श्रावण महिन्यात साप दिसणं म्हणजे...
मुंबई : आषाढ संपला की शिवभक्तांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. जुलैच्या 25 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावणाविषयी शिवभक्तांमध्ये मोठी उत्सुकता असते. श्रावण सोमवारी व्रत-उपवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे, या ऋतूमध्ये सर्वत्र हिरवळ दिसून येते. श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेले विष शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते आणि हा प्रसंग श्रावण महिन्यात घडला होता. त्यामुळे या महिन्यात शंकराची उपासना केल्याने ते लवकर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. तसेच महादेवाच्या गळ्यात नाग असतो, तोही महादेवाच्या गळ्याला थंडावा देण्यासाठी असल्याचे मानले जाते. त्यामुळे श्रावणाचा सापांशी संबंध जोडला जातो. सापाला महादेवाचा हार मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात साप दिसण्यावर कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
श्रावणात साप दिसणं शुभ की अशुभ - प्राचीन काळापासून हिंदू धर्मात सापांची पूजा केली जात आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि ग्रंथांमध्ये सापांना पवित्र प्राणी देखील मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, श्रावण महिन्यात साप दिसणे शुभ मानले जाते. महादेवांना साप खूप प्रिय असतात, म्हणूनच त्यांनी त्यांच्या गळ्यात साप धारण केला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणामध्ये साप दिसणं शुभ मानलं जातं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भगवान शिव तुमच्या पूजेवर खूप प्रसन्न आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला श्रावण महिन्यात कुठंही साप दिसला तर ताबडतोब शंभू-महादेवाचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
advertisement
पांढरा साप दिसणं - पांढरा साप दिसणं जरी दुर्मीळ असलं तरी जर तुम्हाला तो कुठेतरी दिसला तर असे समजा की, भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुम्ही त्यांच्या सर्वात मोठ्या भक्तांपैकी एक आहात. याचा अर्थ भोलेनाथ तुमच्यासोबत आहेत, आता तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल.
advertisement
स्वप्नात साप दिसणं - श्रावणात तुम्हाला स्वप्नातही साप किंवा नाग दिसत असेल तर असे समजा साक्षात महादेव तुम्हाला दर्शन देत आहेत आणि लवकरच ते तुमचे सर्व दुःख दूर करतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण महिन्यात साप दिसणं शुभ म्हणावं की आणखी काही? अशा गोष्टींचा तो संकेत