November Vivah Muhurat 2025 Date: लग्नाचा बार उडवायची तयारी ठेवा! नोव्हेंबरमध्ये 14 शुभ विवाह मुहूर्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
November Vivah Dates 2025 Muhurat: चातुर्मास संपल्यानंतर लग्नाचा हंगामही सुरू होतो. कार्तिकी एकादशीनंतर नोव्हेंबरमध्ये शुभ विवाह होतील. यंदा नोव्हेंबर २०२५ मध्ये १४ दिवस लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.
मुंबई : प्रबोधिनी (देवउठनी) एकादशीच्या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत आहे. त्या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये सुरू होतील. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर आल्यावर शुभ कार्यांना प्रारंभ होईल. चातुर्मास संपल्यानंतर लग्नाचा हंगामही सुरू होतो. कार्तिकी एकादशीनंतर नोव्हेंबरमध्ये शुभ विवाह होतील. यंदा नोव्हेंबर २०२५ मध्ये १४ दिवस लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये शुभ विवाहासाठी एकूण १४ मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमधील विवाहाचे मुहूर्त आणि तारखांबद्दल जाणून घेऊया.
कार्तिकी एकादशी कधी - यावेळी कार्तिकी एकादशी दोन दिवस, १ नोव्हेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी आहे. पंचांगानुसार, कार्तिकी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी तिथीला असते.
कार्तिक शुक्ल एकादशी तिथीचा प्रारंभ: १ नोव्हेंबर, सकाळी ९:११ वाजल्यापासून
कार्तिक शुक्ल एकादशी तिथीची समाप्ती: २ नोव्हेंबर, सकाळी ७:३१ वाजता
नोव्हेंबरमध्ये विवाहाचे मुहूर्त आणि तारखा -
advertisement
यावेळी नोव्हेंबरच्या ३० दिवसांमध्ये शुभ विवाहासाठी एकूण १४ मुहूर्त आहेत. या वर्षी २ नोव्हेंबरपासूनच विवाहाचे मुहूर्त सुरू होतील.
लग्नाचे मुहूर्त | दिवस | शुभ विवाह मुहूर्त |
2 नोव्हेंबर | रविवार | 11:11 पी एम ते 06:34 ए एम, 3 नोव्हेंबर |
3 नोव्हेंबर | सोमवार | 06:34 ए एम ते 07:40 पी एम |
6 नोव्हेंबर | गुरुवार | 03:28 ए एम ते 06:37 ए एम, 7 नोव्हेंबर |
8 नोव्हेंबर | शनिवार | 07:32 ए एम ते 10:02 पी एम |
12 नोव्हेंबर | बुधवार | 12:51 ए एम ते 06:42 ए एम, 13 नोव्हेंबर |
13 नोव्हेंबर | गुरुवार | 06:42 ए एम ते 07:38 पी एम |
16 नोव्हेंबर | रविवार | 06:47 ए एम ते 02:11 ए एम, 17 नोव्हेंबर |
17 नोव्हेंबर | सोमवार | 05:01 ए एम ते 06:46 ए एम, 18 नोव्हेंबर |
18 नोव्हेंबर | मंगळवार | 06:46 ए एम ते 07:12 ए एम |
advertisement
21 नोव्हेंबर | शुक्रवार | 10:44 ए एम ते 01:56 पी एम |
22 नोव्हेंबर | शनिवार | 11:27 पी एम ते 06:50 ए एम, 23 नोव्हेंबर |
23 नोव्हेंबर | रविवार | 06:50 ए एम ते 12:09 पी एम |
25 नोव्हेंबर | मंगळवार | 12:50 पी एम ते 11:57 पी एम |
30 नोव्हेंबर | रविवार | 07:12 ए एम ते 06:56 ए एम, 1 डिसेंबर |
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
November Vivah Muhurat 2025 Date: लग्नाचा बार उडवायची तयारी ठेवा! नोव्हेंबरमध्ये 14 शुभ विवाह मुहूर्त