Numerology: पूर्वीच्या कष्टाचे फळ आता दिसू लागणार; शनिवारचा दिवस 3 मूलांकासाठी भाग्याचा, धनकमाई
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शनिवारी काही वाईट परिस्थिती येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. एकामागून एक अडचणी वाढू लागल्यानं तुमची शांतता भंग होऊ शकते. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील. नवीन नोकरीची संधी येऊ शकते. ती स्वीकारणं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तुमच्या जोडीदाराला तुमच्यामुळे त्रास होईल, असे वागू नका.
Lucky Colour: White
Lucky Number: 5
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज घरामध्ये वाद होऊ शकतो, काळजी घ्या. तुमचा दिवस मुलांच्या सहवासात चांगला जाईल. आज जमीन किंवा मालमत्तेसंबंधी व्यवहार टाळा, नुकसान होईल. आज शनिवारी आपणास कष्टाच्या तुलनेत जास्त पैसे मिळतील. जोडीदारासोबत दिवस उत्तम जाईल.
advertisement
Lucky Colour: Electric Grey
Lucky Number: 8
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कित्येक दिवसांपासून तुमचे अडकलेले सरकारी काम मार्गी लागेल. तुमच्यातील कौशल्य तुम्हाला नवीन नोकरी देण्यास उपयुक्त ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. थंडीताप येऊ शकतो. उबदार कपडे वापरा, फायद्याचं ठरेल. उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढल्यानं अडचणी येतील. जोडीदाराशी वागताना संयम ठेवा, वाद घातल्यानं ताण वाढेल.
advertisement
Lucky Colour : Light Grey
Lucky Number : 17
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा शनिवारचा दिवस असेल. तुम्हाला नोकरी, व्यवसायात चांगले यश मिळेल. आर्थिक समृद्धीचा आजचा दिवस आहे. बॉसशी मतभेद होऊ शकतात. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
advertisement
Lucky Colour : Dark Yellow
Lucky Number : 9
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कुटुंबातील लोकांना तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस असणार नाही. शनिवारी थोडीही शांतता नसेल, काळजी घ्या. कामामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे. भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्यक्तींवर तुमचा खर्च होऊ शकतो. तुमच्यासाठी परिपूर्ण जोडीदार भेटू शकतो.
advertisement
Lucky Colour : Yellow
Lucky Number : 2
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्ही काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरेल. आध्यात्मिक शिक्षणाकडे कल राहील. आरोग्याची काळजी घ्या. शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळेल. प्रत्येक वळणावर जोडीदाराला पाठिंबा द्या. तुम्हाला ते फायद्याचं ठरेल.
advertisement
Lucky Colour : Baby Pink
Lucky Number : 6
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शनिवार असतानाही सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिकदृष्ट्या समृद्धीचा दिवस आहे. एखादी मालमत्ता खरेदी करू शकता. त्यासाठी योग्य वेळ आहे. ठरवलेली कामं सहज साध्य होतील. प्रेमाच्या बाबतीत एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे.
Lucky Colour: Dark Green
Lucky Number: 5
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात तुमचा प्रामाणिकपणा आणि सरळपणा तुम्हाला यश मिळवून देईल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा, फायद्याचं ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन व्यावसायिक भागिदारी करण्यासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदाराशी असणारं नातं दृढ होईल. नातेसंबंध जपण्यास प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Dark Turquoise
Lucky Number : 4
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शनिवारी काही अडचणी येतील पण, कठोर परिश्रम केल्यामुळे यश मिळेल. पण तुम्हाला वैयक्तिक लाभामधूनच प्रेरणा मिळेल, असे नाही. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या कल्पना एखाद्याला प्रभावित करतील. प्रयत्न केल्यानं यश मिळेल. जोडीदाराशी तुमचं नातं अर्थपूर्ण राहील.
Lucky Colour : Parrot Green
Lucky Number : 15
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: पूर्वीच्या कष्टाचे फळ आता दिसू लागणार; शनिवारचा दिवस 3 मूलांकासाठी भाग्याचा, धनकमाई