advertisement

गॉसिप पार्टनर नाही 'या' मूलांकाचे लोक असतात 'बेस्ट सिक्रेट किपर', डोळे झाकून ठेवू शकता विश्वास; मैत्रीत देत नाही धोका!

Last Updated:

अंकशास्त्रानुसार, तुमची जन्मतारीख केवळ तुमचे व्यक्तिमत्वच ठरवत नाही, तर तुम्ही नात्यात किती विश्वासू आहात हे देखील सांगते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक मित्र असतो ज्याच्याकडे आपण आपली सर्व गुपिते बिनधास्तपणे सांगू शकतो.

News18
News18
Numerology : अंकशास्त्रानुसार, तुमची जन्मतारीख केवळ तुमचे व्यक्तिमत्वच ठरवत नाही, तर तुम्ही नात्यात किती विश्वासू आहात हे देखील सांगते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक मित्र असतो ज्याच्याकडे आपण आपली सर्व गुपिते बिनधास्तपणे सांगू शकतो. काही खास तारखांना जन्मलेले लोक उपजतच 'बेस्ट सीक्रेट कीपर' असतात. ते स्वतःच्या पोटातील शब्द बाहेर काढत नाहीत आणि मैत्रीसाठी प्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुमचे मित्र/मैत्रिणी या मूलांकाचे असतील तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण नसतील तर तुमचे सिक्रेट सांगताना दहावेळा विचार करा.
मूलांक 8 - तारीख 8, 17 आणि 26
ज्यांचा मूलांक 8 आहे म्हणजेच ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, ते लोक अत्यंत गंभीर आणि संयमी स्वभावाचे असतात. या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. हे लोक सहजासहजी कोणाशी मैत्री करत नाहीत, पण एकदा का कोणाला मित्र मानले की, त्याच्यासाठी ते शेवटपर्यंत उभे राहतात. हे लोक तुमची गुपिते काळजाच्या कोपऱ्यात दडवून ठेवतात आणि ती कधीही उघड करत नाहीत.
advertisement
मूलांक 2 - तारीख 2, 11, 20 आणि 29
मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत भावूक आणि संवेदनशील असतात. ते समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करतात. जर तुम्ही त्यांना एखादी खाजगी गोष्ट सांगितली, तर त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य समजते. हे लोक आपल्या मित्राला धोका देण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाहीत. या मूलांकाचे लोक एखादे सिक्रेट खूप जपून ठेवतात. या मूलांकाच्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता.
advertisement
मूलांक 7 - तारीख 7, 16 आणि 25
मूलांक 7 चे लोक थोडे रहस्यमयी स्वभावाचे असतात. केतूचा प्रभाव असल्याने हे लोक अध्यात्मिक आणि खोल विचार करणारे असतात. त्यांना इतरांच्या आयुष्यात डोकावणे आवडत नाही आणि इतरांनी त्यांच्याकडे सोपवलेला विश्वास ते जीवापाड जपतात. त्यांच्याकडे तुम्ही कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्यांच्यासोबतच कायमची सुरक्षित राहते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
गॉसिप पार्टनर नाही 'या' मूलांकाचे लोक असतात 'बेस्ट सिक्रेट किपर', डोळे झाकून ठेवू शकता विश्वास; मैत्रीत देत नाही धोका!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement