आखाती देशातील चाललेल्या युद्धाचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. तसेच आता निर्यात बंदचा फटका हा पंढरपूरमधील द्राक्षांनाही बसला आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष ही कोल्डस्टोरेजमध्ये ठेवण्यावर शतकऱ्यांचा ओढा जास्त झाला आहे. या सगळ्यामुळे पंढरपूरमधील कोल्डस्टोरेज हाऊसफुल होताना दिसत आहेत.



