Pitru Paksha 2025: उरले काही तास, शेवटचा उपाय नारायणबळी..! अतृप्त पूर्वजांना शांत करण्यासाठी विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitru Paksha 2025: नारायणबळी हा एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे, तो अशा व्यक्तींसाठी केला जातो ज्यांचा अकाली किंवा अपघाती मृत्यू झाला आहे, किंवा ज्यांना मोक्ष मिळाला नाही. त्यामुळे अशा लोकांचा आत्मा अतृप्त राहतो, किंवा प्रेत बनतो असे मानले जाते. त्यासाठी हा विधी...
मुंबई : पितृपक्षातील आता शेवटचा दिवस म्हणजे पितृअमावस्या बाकी आहे. पूर्वजांना तृप्त करून त्यांना मोक्ष प्राप्तिसाठी विविध उपाय केले जातात. कोणाचा मृत्यू कसा झाला आहे, तिथीनुसार श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्ष आता संपत आला असून पितृशांतीसाठी काहीच काळ उरला आहे. आज आपण नारायणबळी विधीविषयी जाणून घेऊ. नारायणबळी पितृपक्षातील एक महत्त्वाचा विधी आहे, तो पितरांच्या (पूर्वजांच्या) आत्म्याला विशेष प्रकारे शांती देण्यासाठी केला जातो.
नारायणबळी हा एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे, तो अशा व्यक्तींसाठी केला जातो ज्यांचा अकाली किंवा अपघाती मृत्यू झाला आहे, किंवा ज्यांना मोक्ष मिळाला नाही. त्यामुळे अशा लोकांचा आत्मा अतृप्त राहतो, किंवा प्रेत बनतो असे मानले जाते. त्यासाठी हा विधी काही विशेष उद्देशांसाठी केला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अपघाताने, आत्महत्येने, किंवा कोणत्याही अनैसर्गिक कारणाने झाला असेल, तर त्याच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावा यासाठी नारायणबळी केला जातो.
advertisement
ज्यांच्या आत्म्यांना योग्य क्रियाकर्म न मिळाल्यामुळे मुक्ती मिळत नाही, अशांसाठी हा विधी केला जातो. यामुळे त्यांच्या पिढीला होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते. कुटुंबात पितृदोष असेल, तर त्याचे निवारण करण्यासाठी नारायणबळी केला जातो. हा विधी मुख्यतः त्र्यंबकेश्वर (नाशिक), गोकर्ण (कर्नाटक) किंवा इतर काही पवित्र ठिकाणी केला जातो. नारायणबळी हा एक विशिष्ट प्रकारचा श्राद्ध विधी आहे, तो सामान्य श्राद्धापेक्षा वेगळा असून काही विशिष्ट परिस्थितीतच केला जातो.
advertisement
पितर अतृप्त असल्यास -
घरात वारंवार भांडणे होणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसांत वाद-विवाद वाढणे आणि शांतता नसणे हे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. घरात पैसा न टिकणे, व्यवसायात सतत तोटा होणे किंवा नोकरीत अडचणी येणे यांसारख्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणे. कुटुंबातील एखाद्याला दीर्घकाळ आजार असणे किंवा वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवणे. कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहात अडथळे येणे किंवा लग्नानंतरही वैवाहिक जीवनात कलह निर्माण होणे. शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अपेक्षित यश न मिळणे किंवा प्रगती खुंटणे. कोणत्याही शुभ कार्याची योजना केल्यास त्यात अडचणी येणं किंवा ते पूर्ण न होणं. अशा गोष्टी कुटुंबात दिसून येतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitru Paksha 2025: उरले काही तास, शेवटचा उपाय नारायणबळी..! अतृप्त पूर्वजांना शांत करण्यासाठी विधी