Happy Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला आयुष्मान आणि सौभाग्य योग! या वेळात राखी बांधल्यास मिळेल दुहेरी लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Happy Raksha Bandhan 2025: राखी पौर्णिमेला शुभ मुहूर्तावर राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने दुप्पट फळ मिळेल, त्याविषयी ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1:42 वाजल्यापासून सुरू झाली आहे. ही तिथी 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:24 पर्यंत असेल. उदय तिथीच्या आधारे 9 ऑगस्ट रोजी दिवसभर रक्षाबंधन साजरं होणार आहे. दृक पंचांगानुसार, या वर्षी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेपर्यंत श्रावण नक्षत्र आहे. त्यानंतर धनिष्टा नक्षत्र सुरू होईल. आयुष्मान योग पहाटे 5:56 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर, दिवसभर सौभाग्य योगाचा विशेष संयोग आहे. त्यामुळे या मुहूर्तावर राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने दुप्पट फळ मिळेल, त्याविषयी ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 5:29 ते 06:05
सर्वात शुभ काळ - सकाळी 06:06 ते 08:20
विजय काळ - सकाळी 10:47 ते 11:58
अभिजित मुहूर्त - सकाळी 11:59 ते दुपारी 12:53
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची पद्धत -
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांच्या मते, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी औक्षण ताट तयार करणे आवश्यक आहे. या ताटात राखी, अक्षता, मिठाई आणि दिवा असल्याची खात्री करा. औक्षण ताट आधी इष्टदेवाला समर्पित करून त्यांची पूजा करा. यानंतर, ताटात ठेवलेली पहिली राखी श्री गणेशाला अर्पण करा. नंतर भावाला पूर्वेकडे तोंड करून राखी बांधण्यासाठी बसवावे. तसेच भाऊ आणि बहीण दोघांनीही स्वच्छ कापडाने आपले डोके झाकावे.
advertisement
राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व -
राखी बांधताना भावाच्या कपाळावर टिळा लावा, थोडे तांदूळ शिंपडा आणि नंतर राखी बांधा. राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. ही परंपरा भावाच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम भावाला राखी बांधावी आणि नंतर सगळ्या जेवावे. तसेच, या दिवशी गरजू व्यक्तीला दान देणे देखील खूप पुण्यपूर्ण मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Happy Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला आयुष्मान आणि सौभाग्य योग! या वेळात राखी बांधल्यास मिळेल दुहेरी लाभ


