advertisement

ChandraGrahan 2026: चंद्र 93 टक्के काळवंडणार; वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कधी? कुठे-कसे दिसणार, भारतातूनही..

Last Updated:

Second Chandra Grahan 2026: मार्चच्या सुरुवातीला म्हणजेच 3 मार्चच्या रात्री लोकांनी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पाहिलं, जे भारताच्या अनेक भागांत स्पष्ट दिसलं. आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे, कारण याच वर्षी ऑगस्टमध्ये दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण लागणार आहे.

News18
News18
मुंबई : आकाशात घडणाऱ्या खगोलीय घटना नेहमीच आपली उत्सुकता वाढवतात. चंद्र, सूर्य आणि ग्रहांच्या हालचालीत होणारा छोटासा बदलही जगाचं लक्ष वेधून घेतो. वर्ष 2026 अशाच घटनांमुळे चर्चेत आहे. मार्चच्या सुरुवातीला म्हणजेच 3 मार्चच्या रात्री लोकांनी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पाहिलं, जे भारताच्या अनेक भागांत स्पष्ट दिसलं. आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे, कारण याच वर्षी ऑगस्टमध्ये दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण खूप खास मानलं जात आहे, कारण चंद्राचा मोठा भाग पृथ्वीच्या सावलीत झाकला जाणार असून त्याचा रंग तांबूस लाल दिसू शकतो.
वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी - 2026 या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 3 मार्चला झालं होतं. आता दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 27 आणि 28 ऑगस्ट 2026 च्या रात्री लागेल. खगोल शास्त्रज्ञांच्या मते हे एक लांब चालणारं चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राचा जवळपास 93 टक्के भाग पृथ्वीच्या दाट सावलीत लपला जाईल. यामुळे चंद्राचा रंग फिकट लाल किंवा तांब्यासारखा दिसू शकतो. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा सूर्याचा थेट प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळी पृथ्वीच्या वातावरणातून वळून येणारा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो लाल दिसू लागतो, ज्याला अनेकजण ब्लड मून सुद्धा म्हणतात. हे चंद्रग्रहण बराच वेळ चालेल आणि याची संपूर्ण प्रक्रिया साधारण 5 तास 39 मिनिटे असेल.
advertisement
ग्रहणाची मुख्य वेळ (भारतीय वेळेनुसार अंदाजे) - भारतीय वेळेनुसार (IST) हे ग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 6 वाजून 53 मिनिटांनी सुरू होईल. ग्रहणाची सर्वोच्च स्थिती (Peak) सकाळी 10 वाजून 11 मिनिटांनी असेल आणि दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी हे ग्रहण संपेल. या सर्वोच्च स्थितीत चंद्राचा 93 टक्के भाग झाकला गेल्यामुळे त्याचं दृश्य खूपच आकर्षक दिसेल.
advertisement
भारतात दिसणार की नाही - सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे ग्रहण भारतात दिसेल का? तर खगोल शास्त्रज्ञांच्या मते हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. याचं कारण असं की, ज्या वेळी हे ग्रहण सुरू असेल त्या वेळी भारतात दिवस असेल आणि चंद्र क्षितिजाच्या खाली असेल. हे ग्रहण प्रामुख्याने अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पूर्व प्रशांत महासागराच्या आसपासच्या भागांतून स्पष्टपणे पाहता येईल.
advertisement
भारतात सूतक काळ का मानला जाणार नाही -  चंद्रग्रहणाच्या वेळी अनेकजण धार्मिक नियम आणि सूतक काळाबद्दल विचारतात. ज्योतिष परंपरेनुसार, जर एखादं ग्रहण आपल्या देशात किंवा भागात दिसत नसेल, तर तिथे सूतक काळ मानला जात नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांसाठी या ग्रहणादरम्यान कोणतेही धार्मिक नियम किंवा पाळण्याची गरज नसेल. लोक नेहमीप्रमाणे आपली दैनंदिन कामं करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
ChandraGrahan 2026: चंद्र 93 टक्के काळवंडणार; वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कधी? कुठे-कसे दिसणार, भारतातूनही..
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement