advertisement

ShaniDev: कुंडलीत शनी बसलाय मानगुटीवर? आयुष्याची दशा बदलवण्यासाठी शनिवारी करा 7 चमत्कारी उपाय

Last Updated:

Shaniwar Upay: ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार, जेव्हा शनी अशुभ किंवा कमकुवत असतो, तेव्हा व्यक्तीला वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो. नोकरीत अस्थिरता, व्यवसायात तोटा, कोर्ट-कचेरीची प्रकरणं किंवा कुटुंबात होणारे वाद ही त्याची लक्षणं असू शकतात.

News18
News18
मुंबई : बऱ्याचदा आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक कामात अडचणी येऊ लागतात. मेहनत करूनही फळ मिळत नाही, घरात विनाकारण ताणतणाव राहतो आणि आर्थिक गणितही बिघडतं. अशा वेळी अनुभवी माणसं म्हणतात की "शनी मागे लागलाय." कुंडलीत शनी अशक्त असेल तर संघर्षात वाढ होते, असे मानले जाते. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. ज्योतिष शास्त्र आणि लाल किताबमध्ये असे काही सोपे उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने शनीदेवाची कृपा मिळवता येते आणि आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणता येते. ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबद्दल काही खास माहिती दिली आहे.
कुंडलीत शनी अशक्त असल्याची लक्षणं - ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार, जेव्हा शनी अशुभ किंवा कमकुवत असतो, तेव्हा व्यक्तीला वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो. नोकरीत अस्थिरता, व्यवसायात तोटा, कोर्ट-कचेरीची प्रकरणं किंवा कुटुंबात होणारे वाद ही त्याची लक्षणं असू शकतात. अनेकदा मेहनत दुप्पट करावी लागते पण फळ मात्र अगदीच कमी मिळतं. हा पूर्णपणे श्रद्धेचा विषय असला तरी भारतात मोठ्या प्रमाणात लोक शनिवारी विशेष उपाय करून मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
शनिवारी करायचे सोपे उपाय -
काळं मीठ किंवा सुरमा जमिनीत रुतवा - लाल किताबनुसार, शनिवारी काळं मीठ किंवा काळा सुरमा एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत दाबणं शुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मकता कमी होते अशी मान्यता आहे.
उडीद आणि काळ्या वस्तूंचं दान - शनिवारी मंदिरात उडीद डाळ, काळी मिरी, काळे चणे किंवा चंदन दान करणं फायदेशीर ठरतं. दान करताना मन शांत आणि भावना प्रामाणिक असावी.
advertisement
शनिवारचं व्रत - नियमितपणे शनिवारचा उपवास केल्यानं मनात संयम निर्माण होतो. अनेक लोक सूर्यास्तानंतरच भोजन करतात आणि दिवसभर शनी मंत्राचा जप करतात.
माशांना खाऊ घाला - सलग 12 शनिवार माशांना अन्नाचे कण किंवा गोळ्या खाऊ घालण्याचा उपाय सांगितला जातो. या उपायामुळे संयम आणि नियमितता वाढते.
advertisement
श्रद्धेसोबतच समजूतदारपणाही महत्त्वाचा - ज्योतिषशास्त्रातील उपाय हा श्रद्धेचा भाग असला तरी आयुष्यात बदल घडवण्यासाठी कर्माचीही तितकीच साथ लागते. जर नोकरीत अडचण असेल तर कौशल्य वाढवणं आणि व्यवसायात तोटा होत असेल तर रणनीती बदलणं हे देखील महत्त्वाचं आहे. लोक उपायांसोबत स्वतःच्या वागण्यात आणि मेहनतीत सुधारणा करतात, तेव्हाच परिस्थिती खऱ्या अर्थानं बदलू लागते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
ShaniDev: कुंडलीत शनी बसलाय मानगुटीवर? आयुष्याची दशा बदलवण्यासाठी शनिवारी करा 7 चमत्कारी उपाय
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement