Shardiya Navratri 2025: नवरात्रामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र पठणाचे विशेष फायदे, पहा 4 महत्त्वाचे नियम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shardiya Navratri 2025: आज आपण देवीच्या सिद्ध कुंजिका स्तोत्राविषयी जाणून घेणार आहोत. सिद्ध कुंजिका स्तोत्र दुर्गा सप्तशतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या स्तोत्राचे पठण केल्यानं दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पठणाचे फळ मिळते, असे मानले जाते. या स्तोत्रात बीज मंत्र आणि शक्ती मंत्र आहेत.
मुंबई : सध्या देशभरात नवरात्र उत्सवाचे प्रसन्न वातावरण आहे. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. विशेष म्हणजे वर्षातून चार वेळा नवरात्री साजऱ्या केल्या जातात, त्यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्री विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे नऊ दिवस नकारात्मक शक्तींवर सकारात्मक शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहेत. या काळात देवीची उपासना केल्यानं भक्तांना आरोग्य, संपत्ती, यश आणि मानसिक शांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील त्रास-अडचणी दूर होतात, आध्यात्मिक प्रगती होते. नवरात्रीमध्ये अनेक भक्त उपवास करतात, देवीची मूर्ती स्थापन करतात आणि धार्मिक विधी करतात. नवरात्रीचा उपवास फक्त फळे खाऊन करण्याची मोठी परंपरा आहे.
आज आपण देवीच्या सिद्ध कुंजिका स्तोत्राविषयी जाणून घेणार आहोत. सिद्ध कुंजिका स्तोत्र दुर्गा सप्तशतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या स्तोत्राचे पठण केल्यानं दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पठणाचे फळ मिळते, असे मानले जाते. या स्तोत्रात बीज मंत्र आणि शक्ती मंत्र आहेत, ते अत्यंत प्रभावी मानले जातात. हे स्तोत्र पठण करणे सोपे आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. हे स्तोत्र भगवान शिवाने पार्वतीला सांगितले होते. यामध्ये देवीच्या सर्व रूपांची स्तुती केली आहे आणि भक्तांना सर्व संकटांपासून वाचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे.
advertisement
सिद्ध कुंजिका स्तोत्र पठणाचे फायदे -
या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे आयुष्यातील सर्व अडचणी आणि संकटे दूर होतात. आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. यामुळे धनप्राप्ती होते आणि व्यवसायात यश मिळते. हे स्तोत्र शत्रूंना पराभूत करण्यासाठी खूप शक्तिशाली मानले जाते. या स्तोत्राचे पठण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नियमित पठणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनातील भीती दूर होते. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करणे शक्य नसल्यास, फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने त्याचेच पुण्य मिळते. नवरात्रीच्या काळात सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shardiya Navratri 2025: नवरात्रामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र पठणाचे विशेष फायदे, पहा 4 महत्त्वाचे नियम


