Shardiya Navratri 2025: तुळस करेल कमाल! नवरात्राचे नऊ दिवस संपण्याआधी 1 महत्त्वाचे काम करून घ्या

Last Updated:

Shardiya Navratri 2025: ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, नवरात्रीत तुळशीच्या रोपाशी संबंधित काही विधी केल्यानं जीवनातील अनेक अडचणींपासून मुक्तता मिळू शकते. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे.

News18
News18
मुंबई : सनातन हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा नऊ दिवसांचा सण देवी दुर्गा आणि तिच्या नऊ शक्तींच्या पूजेचा काळ मानला जातो. देवी दुर्गेची खऱ्या भक्तीभावानं पूजा केल्यानं भाविकांची इच्छा लवकर पूर्ण होते. जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या वर्षी शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली असून 1 ऑक्टोबर रोजी संपेल.
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, नवरात्रीत तुळशीच्या रोपाशी संबंधित काही विधी केल्यानं जीवनातील अनेक अडचणींपासून मुक्तता मिळू शकते. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, घरात तुळस असणं हे शुभ आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. नवरात्रीत तुळशीच्या पूजेशी संबंधित काही विशेष विधी आणि त्यांचे चमत्कारिक फायदे जाणून घेऊया.
advertisement
चांगल्या गोष्टी होतात - नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज तुळशीच्या रोपाजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या उपायानं घरात सकारात्मक उर्जा येते. नकारात्मक शक्ती दूर होतात. दिवा लावल्याने घरात शांती, आनंद आणि सौभाग्य नांदते.
वैवाहिक जीवनात लाभ - नवरात्रीत तुळशी मातेची पूजा करून तिला लाल चुनरी घालून कुंकू, बांगड्या, बिंदी इत्यादी सौंदर्यप्रसाधने अर्पण करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हा उपाय वैवाहिक आनंदासाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो आणि कुटुंबात सुसंवादाचे वातावरण निर्माण होते.
advertisement
आर्थिक अडचणी कमी होतात - तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर नवरात्रीत हा उपाय विशेषतः फायदेशीर मानला जातो. लाल कापडात तुळशीची काही पाने बांधा आणि ती तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी ठेवा. असं केल्यानं आर्थिक समस्या कमी होतील आणि हळूहळू तुमचे धन वाढेल. हा उपाय घरात देवी लक्ष्मीच्या कायमस्वरूपी स्थिरतेचे प्रतीक मानला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shardiya Navratri 2025: तुळस करेल कमाल! नवरात्राचे नऊ दिवस संपण्याआधी 1 महत्त्वाचे काम करून घ्या
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement