13 जानेवारी 2026 खास! ठिक पहाटे 4 नंतर सुरू होणार 'गोल्डन टाइम', 'या' राशींचं चमकणार नशीब
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, वैभव, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्राचे गोचर होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्र आपली रास बदलणार आहे.
Shukra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, वैभव, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्राचे गोचर होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्र आपली रास बदलणार आहे. 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे साधारण 03:40 ते 04:00 च्या दरम्यान शुक्र ग्रह धनु राशीतून बाहेर पडून शनीच्या स्वामित्वाखालील मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत शुक्राचे हे आगमन मकर संक्रांतीच्या ठीक एक दिवस आधी होत आहे. शनी आणि शुक्र यांच्यात मैत्रीचा भाव असल्याने, हे संक्रमण अनेक राशींसाठी 'गोल्डन टाईम' घेऊन येणार आहे. विशेषतः मेष, वृषभ, सिंह आणि तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल.
मेष - करिअरमध्ये मोठी झेप
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे संक्रमण दहाव्या स्थानी होणार आहे. हे स्थान कर्म आणि करिअरचे मानले जाते. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विस्तार करण्याचा आहे. नवीन प्रकल्पात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा देऊन जाईल. समाजात मान-सन्मान वाढेल.
वृषभ - नशिबाची साथ आणि परदेशवारी
वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे, त्यामुळे हे गोचर या राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरेल. शुक्र तुमच्या भाग्यस्थानी प्रवेश करणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. धार्मिक सहली किंवा परदेश प्रवासाचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
सिंह - शत्रूंवर विजय आणि आर्थिक स्थैर्य
सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्राचे मकर राशीतील आगमन सहाव्या स्थानी असेल. जरी हे स्थान आव्हानात्मक मानले जात असले, तरी शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. तुमचे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. जुन्या आजारांपासून सुटका होईल. आर्थिक आघाडीवर, कर्जातून मुक्ती मिळवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मात्र, या काळात खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
तूळ - भौतिक सुखांची रेलचेल
तूळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे. मकर राशीत प्रवेश करताना शुक्र तुमच्या चौथ्या स्थानी विराजमान होईल. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घराच्या सजावटीवर किंवा सुख-सोयींच्या वस्तूंवर खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 4:55 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
13 जानेवारी 2026 खास! ठिक पहाटे 4 नंतर सुरू होणार 'गोल्डन टाइम', 'या' राशींचं चमकणार नशीब









