Vastu Tips: शक्यतो ऑफिसमध्ये या दिशेला तोडं असलेली खुर्ची पकडायची; करिअरच्या गतीला पूरक

Last Updated:

Vastu Tips Marathi: तुम्ही नोकरदार असाल जर तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळत नसेल, काम करण्याची इच्छा होत नसेल, तुमचे सतत कोणा ना कोणत्या कर्मचाऱ्याशी वाद होत असतील, तुमचा बॉस तुमच्यावर वारंवार रागावत असेल किंवा...

News18
News18
मुंबई : वास्तु उपाय अनेक ठिकाणी काम करू शकतात. तुम्ही नोकरदार असाल जर तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळत नसेल, काम करण्याची इच्छा होत नसेल, तुमचे सतत कोणा ना कोणत्या कर्मचाऱ्याशी वाद होत असतील, तुमचा बॉस तुमच्यावर वारंवार रागावत असेल किंवा एखादा करार पूर्ण होत नसेल, तर तुम्ही ऑफिसमध्ये चुकीच्या दिशेसा तोंड करून बसलेले असू शकता. वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये चुकीच्या दिशेला तोंड करून बसल्यानं मोठं नुकसान होऊ शकतं. ऑफिसमध्ये बसण्याची योग्य दिशा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्ये बसण्याची दिशा कोणती असावी, याविषयी जाणून घेऊ.
ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला तोंड असलेल्या खुर्चीवर बसावे?
ऑफिसमध्ये कामाला बसताना पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते. याशिवाय, ईशान्य दिशेला तोंड करून काम करणे देखील शुभ आहे. या दिशांना तोंड करून बसल्यानं करिअरमध्ये वेगात प्रगती होते, यासोबतच पगारही वाढतो असं वास्तुशास्त्र सांगतं. ऑफिसमध्ये बॉसने पश्चिमेकडे बांधलेल्या केबिनमध्ये बसावे आणि त्याचे तोंड ईशान्य दिशेला असावे. असे केल्याने कंपनी किंवा व्यवसायाची वेगाने वाढ होते.
advertisement
ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला तोंड करून बसू नये?
ऑफिसमध्ये काम करताना चुकूनही दक्षिण किंवा आग्नेय दिशेला तोंड करून बसू नये. असे म्हटले जाते की यामुळे एकाग्रता बिघडते, ज्यामुळे कामात यश मिळण्यास उशीर होतो.
ऑफिसच्या डेस्कवर कोणती झाडे ठेवावीत? - ऑफिसच्या डेस्कवर बांबू किंवा जेड वनस्पती ठेवणे शुभ मानले जाते. याशिवाय एरिका पाम, मनी प्लांट, ड्रॅकेना वनस्पती देखील ठेवता येते. ऑफिस डेस्कवर ही रोपे ठेवल्याने नशीब साथ देते असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: शक्यतो ऑफिसमध्ये या दिशेला तोडं असलेली खुर्ची पकडायची; करिअरच्या गतीला पूरक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement