Surya Grahan 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी? नवरात्रीच्या आधी सूतक काळ, भारतात दिसणार का?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Grahan 2025: वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होऊन गेले आहे. २०२५ मध्ये पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. आता दुसरे सूर्यग्रहण शारदीय नवरात्रीच्या एक दिवस आधी होणार आहे.
मुंबई : हिंदू धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः ज्योतिषशास्त्रात ही एक अशुभ घटना मानली जाते. विज्ञानाच्या दृष्टीने ही निव्वळ खगोलीय घटना आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होऊन गेले आहे. २०२५ मध्ये पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. आता दुसरे सूर्यग्रहण शारदीय नवरात्रीच्या एक दिवस आधी होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होईल त्याविषयी जाणून घेऊ, सुतक काळासह इतर माहिती पाहुया.
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होईल -
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला होणार आहे. म्हणजेच त्यादिवशी सर्वपित्री दर्श अमावस्या असेल. सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२४ वाजेपर्यंत असेल. त्याचा एकूण कालावधी ४ तास २४ मिनिटे असेल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे अश्विनी मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सुरू होईल. ज्याने शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल.
advertisement
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसेल की नाही?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, अर्थातच ते रात्री होत आहे. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराच्या काही भागातून पाहता येईल.
वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी-
शास्त्रांनुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या सुमारे १२ तास आधी सुतक काळ सुरू होतोय. पण वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 7:36 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी? नवरात्रीच्या आधी सूतक काळ, भारतात दिसणार का?