Friday Astro: शुक्रवारी कधीही खाऊ नयेत या गोष्टी! बँक अकांऊट रिकामं होऊ लागतं; लक्ष्मीची अवकृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Friday Astro: शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्याची कमतरता जाणवत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे. अनेक स्त्रिया शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत करतात. या व्रतामुळे कुटुंबात आनंद, सुख आणि समाधान मिळते.
मुंबई : शुक्रवार हा हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला समर्पित दिवस मानला जातो. लक्ष्मी ही धन, समृद्धी, सौभाग्य, आणि ऐश्वर्याची देवी आहे. म्हणूनच, अनेक भाविक या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून तिच्या कृपेसाठी प्रार्थना करतात. याशिवाय, शुक्रवार हा देवी संतोषी मातेलाही समर्पित आहे, ज्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-शांती आणि समाधान मिळते.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्याची कमतरता जाणवत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे. अनेक स्त्रिया शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत करतात. या व्रतामुळे कुटुंबात आनंद, सुख आणि समाधान मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, कला, प्रेम आणि भौतिक सुख-सुविधांचा कारक आहे. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांमुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते.
advertisement
शुक्रवारी या गोष्टी करू नका
- शुक्रवारी कोणतेही तामसिक अन्न खाणे टाळा. ही चूक देवी लक्ष्मीला क्रोधित करू शकते. शुक्रवारी घरी शिजवलेले, सात्विक अन्न खाणे उचित आहे. शुक्रवारी मांसाहार अन्न खाऊ नये. मांसाहारी अन्न खाल्ल्याने लक्ष्मी, संतोषी आणि शीतला देवींना क्रोध येतो, असे मानले जाते. शुक्रवारी आंबट अन्न खाणे देखील निषिद्ध आहे.
advertisement
- शुक्रवारी मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्वयंपाकघरातील भांडी किंवा पूजेशी संबंधित वस्तू खरेदी करू नयेत. तसेच शुक्रवारी आंबट वस्तू खरेदी करू नयेत. असे करणे खूप अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि घरावरील होतात. शुक्रवारी सोने, चांदी, आलिशान कार, सजावटीच्या वस्तू आणि घर खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते.
advertisement
- शुक्रवारी पैसे उधार घेणे टाळा; असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते. शिवाय, कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो, ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 2:32 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Friday Astro: शुक्रवारी कधीही खाऊ नयेत या गोष्टी! बँक अकांऊट रिकामं होऊ लागतं; लक्ष्मीची अवकृपा