Tirupati Temple Secrets: तिरुपती बालाजी मंदिराविषयीच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; लाडूच्या प्रसादाशिवायही...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tirupati Temple Secrets: तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार श्री वेंकटेश्वर स्वामी यांना समर्पित आहे. भाविक भक्तांच्या श्रद्धेनुसार, कलियुगात भगवान विष्णूंचे हे वैयक्तिक निवासस्थान मानले जाते.
मुंबई : भारतात अनेक मंदिरे आहेत, त्यांचा मोठा वैभवशाली इतिहास आहे. आपल्याकडे अनेक प्राचीन मंदिरे असून काही अतिशय श्रीमंत मंदिरे आणि देवस्थाने आहेत. श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर अद्वितीय आहे. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले हे मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेच, पण त्याची अनेक रहस्ये देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिराच्या काही खास रहस्यांबद्दल सांगणार आहोत.
तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार श्री वेंकटेश्वर स्वामी यांना समर्पित आहे. भाविक भक्तांच्या श्रद्धेनुसार, कलियुगात भगवान विष्णूंचे हे वैयक्तिक निवासस्थान मानले जाते. भगवान या मंदिरात केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. तिरुपती बालाजी मंदिरात अर्पण केलेले लाडू प्रसाद म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, लोक दूरवरून नैवेद्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. पण अनेकांना कदाचित माहीत नसेल की, लाडूंव्यतिरिक्त भगवान तिरुपती बालाजीला दही आणि भात अर्पण करण्याची परंपरा आहे? त्यांना पहिला नैवेद्य म्हणून दही आणि भात अर्पण केला जातो. भक्तांच्या भक्तीमुळे दही आणि तांदूळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली.
advertisement
तिरुपती येथे आपण केस का अर्पण करतो?
तिरुपती बालाजी मंदिरात केस अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, भगवान विष्णूने कुबेराकडून कर्ज घेतले होते आणि कलियुगाच्या अखेरीस ते परत करण्याचे वचन दिले होते. हे कर्ज फेडण्यासाठी, भाविक भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपले केस दान करतात. केसांचे दान म्हणजे जणू कर्जाचा हप्ता म्हणून पाहिले जाते. या प्रथेमागे अनेक आख्यायिका आहेत.
advertisement
धोतर पण आणि साडी पण -
तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्ती खूप खास आहे. मूर्तीच्या मागे समुद्राच्या लाटांचा आवाज नेहमीच ऐकू येतो, असे मानले जाते. ज्यांनी मूर्तीच्या मागे कान देऊन ऐकले आहे, त्यांनी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त मूर्तीला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचेही स्वरूप मानले जाते, म्हणून बालाजीला पुरुष आणि महिला दोघांच्याही पोशाखात सजवले जाते. म्हणजे कधी धोतर तर कधी साडी घातली जाते.
advertisement
मूर्तीवरील खरे केस - तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्तीचे केस हे खरे असल्याचे सांगितले जाते. मूर्तीवरील केसांचा कधीही गुंता होत नाही, ते नेहमीच काळे आणि चमकदार राहतात.
उन्हाळ्यात देवाला घाम -
केसांव्यतिरिक्त आणखी एक विशेष बाब म्हणजे श्री वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीला उन्हाळ्यात घाम येतो. घाम गळताना पाहिले गेले आहे. तिरुपती बालाजी मंदिरात नेहमीच दिवा जळता ठेवला जातो. कोणीही दिव्यात तेल किंवा तूप ओतत नाही, तरीही तो सतत जळत राहतो. हा दिवा सर्वांसाठी एक गूढ असल्याचे सांगितले जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Tirupati Temple Secrets: तिरुपती बालाजी मंदिराविषयीच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; लाडूच्या प्रसादाशिवायही...


