Navratri Vastu Tips: नवरात्रीला घरी घटस्थापना करणार असल्यास या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करू नका

Last Updated:

Navratri Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष हे कुटुंबातील लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. नीट सुरू असलेल्या कामांमध्येही अचानक व्यत्यय येऊ शकतो. जगदंबा देवीचे आशीर्वाद मिळावेत यासाठी तुम्ही नवरात्रीदरम्यान काही उपाय करू शकता.

News18
News18
मुंबई : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर लगेचच नवरात्रीची सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबरपासून देशभरात देवी दुर्गेचा नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जाईल. या नऊ दिवसांत भक्तीभावे दुर्गा देवीची पूजा केल्यानं सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते, देवीला प्रसन्न करण्यासोबतच काही वास्तु नियमांची काळजी घ्यायला हवी.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील वास्तुदोष हे कुटुंबातील लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. नीट सुरू असलेल्या कामांमध्येही अचानक व्यत्यय येऊ शकतो. जगदंबा देवीचे आशीर्वाद मिळावेत यासाठी तुम्ही नवरात्रीदरम्यान काही उपाय करू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजाची रचना, आकार आणि दिशा लोकांच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावते. कारण येथून घरात ऊर्जा प्रवेश करते. म्हणूनच, घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा प्रत्येकासाठी फायदेशीर असते. म्हणून, काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
नवरात्र काळात मुख्य दरवाजाची स्वच्छता नेहमी राखा.
मुख्य दाराजवळ कचराकुंडी किंवा झाडू ठेवू नये.
दाराचा उघड-झाप करताना आवाज होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.
कलश प्रतिष्ठापनेसाठी योग्य दिशा -
वास्तूशास्त्रानुसार, घटस्थापना करण्यासाठी पूजास्थळाची मांडणी ईशान्य दिशेला करावी. ही दिशा पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाते. तसेच, देवी दुर्गेचा फोटो ईशान्य दिशेला अशा प्रकारे ठेवा की, मूर्ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असेल. काही कारणास्तव तुमच्या घरात ईशान्य दिशेला पूजा मांडणी करणं शक्य नसल्यास उत्तर किंवा पूर्व दिशा निवडू शकता.
advertisement
निरंतर ज्योतीसाठी उपाय - नवरात्रीत तुम्ही निरंतर ज्योत तेवत ठेवणार असाल तर ती नेहमी आग्नेय दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रात, शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ही योग्य दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार, नवरात्रीत गरीब आणि गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ आणि अन्न दान केल्याने शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Navratri Vastu Tips: नवरात्रीला घरी घटस्थापना करणार असल्यास या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करू नका
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement