advertisement

Dreams: कुत्रा मागं लागल्याचं स्वप्नात दिसण्याचा अर्थ काय? शनिदोषाचा संकेत मानावा का?

Last Updated:

Dreams life tips: काही जणांची स्वप्नं जशीच्या तशी खरी होतात, तर काहींच्या स्वप्नांचं कनेक्शन खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतं.

News18
News18
मुंबई : स्वप्नात कोणाला काय दिसेल याचा काहीच अंदाज लावता येणार नाही. आपल्याला स्वप्नात कुत्रा दिसतो. कधी तो रडताना, चावताना किंवा पाठलाग करताना दिसतो. आपल्या प्रत्येक स्वप्नामध्ये भविष्याविषयी काही चांगले-वाईट संकेत असतात, असं स्वप्नशास्त्र सांगतं. त्यामुळे या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. काही जणांची स्वप्नं जशीच्या तशी खरी होतात, तर काहींच्या स्वप्नांचं कनेक्शन खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतं. स्वप्नशास्त्रानुसार ही स्वप्नं आपल्याला भविष्याचा आरसा दाखवतात. ही स्वप्नं आपल्याला भविष्यात काय शुभ किंवा अशुभ घडणार आहे हे समजण्यास मदत करतात.
कुत्रा रागात दिसणं -
रागावलेला कुत्रा स्वप्नात दिसणं अशुभ आहे. स्वप्नशास्त्रानुसार, याचा अर्थ असा आहे, की जवळचा मित्र किंवा नातेवाईकाकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो.
पांढरा कुत्रा दिसणं -
पांढरा रंग शांततेचं प्रतीक मानला जातो. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढरा कुत्रा दिसल्यास तुम्हाला अशा कामात खूप यश मिळेल, ज्यातून भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होईल, असा त्याचा अर्थ होतो.
advertisement
कुत्रा पाठलाग करताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा पाठलाग करताना दिसत असेल तर हा शुभ संकेत आहे. यामुळे भविष्यात चांगली बातमी मिळू शकते. स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या वैवाहिक जीवनातल्या समस्या लवकरच दूर होणार आहेत, असा त्याचा अर्थ आहे.
advertisement
कुत्रा रडताना दिसणं -
स्वप्नात कुत्रा रडताना दिसल्यास सतर्क व्हा. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे, की भविष्यात तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते किंवा तुमचं नुकसान होऊ शकतं.
कुत्रा चावताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा चावताना दिसला तर ते शुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे, की तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. याशिवाय तुम्ही काही अडचणीत असाल तर त्या दूर होतील.
advertisement
कुत्रा जवळ येताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा तुमच्याकडे येताना दिसला असेल तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. याशिवाय, जर तुमचे तुमच्या मित्रांपैकी कोणाशी काही मतभेद असतील तर ते दूर होऊ शकतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dreams: कुत्रा मागं लागल्याचं स्वप्नात दिसण्याचा अर्थ काय? शनिदोषाचा संकेत मानावा का?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement