tata ची मोठी खेळी, अखेर 54 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात तयार करणार ही कार, किंमत 60 लाख इतकी होईल कमी!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
देशभरातील कारप्रेमींना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. सुमारे पाच दशकांपासून परदेशात तयार होणाऱ्या एका कारचे उत्पादन आता भारतात सुरू होणार आहे.
मुंबई: देशभरातील कारप्रेमींना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. सुमारे पाच दशकांपासून परदेशात तयार होणाऱ्या एका कारचे उत्पादन आता भारतात सुरू होणार आहे. साता समुद्रापलीकडून ही कार देशात आणण्याचे काम इतर कोणी नसून देशातील सर्वात विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक असलेली टाटा ही कंपनी करत आहे. या कारचे सर्व तंत्रज्ञान परदेशी असले तरी ती भारतीय भूमीवर तयार केली जाणार आहे. याचा अर्थ आत्तापर्यंत परदेशी मानली जाणारी ही कार आता देशी अवतारात लोकांसमोर येईल. तसेच तिचे उत्पादन देशात होणार असल्याने किंमतही लाखो रुपयांनी कमी होणार आहे.
ही कार आहे जग्वार लँड रोव्हर, जी कंपनी टाटा समूहाने विकत घेतली असून, आता या कारचे उत्पादन देशात सुरू होणार आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, जग्वार लँड रोव्हर आता भारतात रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. 54 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात प्रथमच या प्रतिष्ठित मॉडेलचे ब्रिटनबाहेर उत्पादन होणार आहे. जग्वार लँड रोव्हर टाटा मोटर्सच्या मालकीची आहे. सध्या या दोन्ही मॉडेलचे उत्पादन केवळ ब्रिटनमधील जग्वार लँड रोव्हरच्या सोलिहुल प्लांटमध्ये केले जाते. तेथूनच ती भारतासह जगभरातील सुमारे 121 बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते.
advertisement
किमतीत होईल 22 टक्क्यांनी घट
जग्वारच्या कारचे उत्पादन देशात सुरू झाल्यावर तिच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील. एका अनुमानानुसार, देशात तिचे उत्पादन सुरू झाल्यावर तिच्या किमती 18 ते 22 टक्क्यांपर्यंत निश्चितपणे कमी होऊ शकतात. दिल्लीत रेंज रोव्हरच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 2.74 कोटी रुपये आहे. यानुसार पाहिलं तर तिची किंमत 22 टक्के म्हणजेच 60 लाख रुपयांनी कमी होईल. त्यानुसार दिल्लीत बेस मॉडेलची किंमत 2.14 कोटी रुपये होईल.
advertisement
अध्यक्षांनी केले रतन टाटांचे कौतुक
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी 15 वर्षांपूर्वी टाटा कुटुंबात जेआरएल ब्रँड आणल्याबद्दल टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ``रेंज रोव्हर आता भारतातच तयार होईल, ही खूप छान भावना आहे. हा क्षण खूप खास असून मला याचा अभिमान वाटतो. या निर्णयामुळे भविष्यात कंपनीच्या देशातील विक्रीत वाढ होईल. जास्त विक्री होईल. पुढचा प्रवास चांगला आहे, अशी मला खात्री वाटते.``
advertisement
81 टक्क्यांनी वाढली विक्री
चंद्रशेखरन म्हणाले की, 'कंपनीचा या मार्केटवर किती विश्वास आहे हे येथील उत्पादनावरून दिसते.'जेआरएल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा म्हणाले की, ``देशातील ग्राहकांची मोठी संख्या पाहता, दोन्ही मॉडेल्स सुलभ करणं हे स्थानिक उत्पादक कंपनीसाठी एक मोठं पाऊल असेल. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदा रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्स उत्पादन भारतात होणार आहे. आमच्यासाठी ही एक मोठी घोषणा आहे. कारण ही आमची प्रमुख वाहनं आहेत आणि 54 वर्षांच्या इतिहासात केवळ सोलिहुलमध्येच ती उत्पादित केली गेली. जेएलआर इंडियाची 2023-24 या मागील आर्थिक वर्षात भारतातील कामगिरी 81 टक्क्यांच्या किरकोळ विक्रीतील वाढीसह 4436 युनिट्स अशी होती.``
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2024 9:56 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
tata ची मोठी खेळी, अखेर 54 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात तयार करणार ही कार, किंमत 60 लाख इतकी होईल कमी!