Splendor चालवणाऱ्या बाप-लेकाला Hero दिली 13 लाखांची स्पोर्ट Bike गिफ्ट, कारण आहे खास?

Last Updated:

Hero MotoCorp ने त्यांना Centennial Edition Hero  भेट देण्याचा निर्णय घेतला, ज्याची किंमत १३ लाख रुपये आहे.

News18
News18
भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या हिरो मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी असं काही केलं की, ज्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हिरोची स्प्लेंडर Hero Splendor बाइकवर प्रत्येकांनी प्रवास नक्कीच केला असेल. पण आजही ही बाइक मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करून आहे. हिरोने स्प्लेंडरमध्ये काळानुसार बदल करून तिला नव्या रुपात आणलं पण कधीच तिचं उत्पादन बंद करण्याची वेळ आली नाही. शहर असो की ग्रामीण भाग असो, प्रत्येक रस्त्यावर स्प्लेंडर ही सुसाट धावते. अशातच एका स्प्लेंडर मालकाला हिरो मोटर्सने तब्बल १३ लाखांची सुपर बाइक भेट म्हणून दिली आहे. बाप आणि मुलाच्या जोडीला ही सुपरबाइक मिळाली आहे. त्याचं कारणही खास असंच आहे.
तर ही बाप बेट्याची जोडी आहे मंगळूर येथील राहणारी. दोन्ही बाप-लेकांनी  २५ वर्षांच्या जुन्या हिरो स्प्लेंडर Splendor वरून मंगळूरहून लडाखपर्यंत प्रवास केला. हल्ली लडाखला जाणारे हे रॉयल एनफील्डला पसंती देत असतात. पण, या बाप-लेकांनी स्प्लेंडरसारख्या १०० सीसीच्या बाइकवर मंगळुरू ते लडाख असा प्रवास केला. बाप-लेकाच्या या धाडसी पराक्रमाने हिरो मोटर्स जाम खुश झाले. त्यांनी या दोघांना सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
Hero MotoCorp ने त्यांना Centennial Edition Hero  भेट देण्याचा निर्णय घेतला, ज्याची किंमत १३ लाख रुपये आहे. वडील आणि मुलगा त्यांच्या २५ वर्षांच्या स्प्लेंडरसह हिरो शोरूममध्ये एकत्र पोहोचले, जिथे सेंटेनिअल एडिशन बाईक त्यांची वाट पाहत होती. भारतात फक्त १०० युनिट्स उपलब्ध आहेत. सेंटेनिअल एडिशन ही हिरोची एक स्पेशल एडिशन बाईक आहे, जी खूपच दुर्मिळ आहे
advertisement
भारतात फक्त १०० युनिट्स
Centennial Edition Hero ही बाईक करिझ्मा एक्सएमआरवर आधारित आहे. ही स्पेशल एडिशन बाईक हीरो मोटोकॉर्पचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आली आहे. हिरोने या बाईकचे १०० युनिट्स बनवले. हिरोच्या अंतर्गत टीमला या बाईकचे सुमारे २५ युनिट्स मिळाले. उर्वरित ७५ युनिट्सचा लिलाव करून हिरोने ८.६ कोटी रुपये कमावले. मंगलोर-लडाख ट्रिपनंतर या जोडप्याला ही बाईक कंपनीकडून गिफ्ट म्हणून मिळाली. हिरोकडून आपल्या ग्राहकासाठी हा एक अतिशय भावनिक असा क्षण होता.
advertisement
Karizma XMR वर तयार ही बाइक
Centennial Edition Hero ही Karizma XMR या बाइकची कॉपी आहे. ही स्पेशल एडिशन खूपच अनोखी आहे. यात कार्बन फायबर बॉडी पॅनल्स, अक्रापोविक एक्झॉस्ट, अॅल्युमिनियम स्विंग आर्म, ४३ मिमी यूएसडी अॅडजस्टेबल फोर्क्स, विल्बर्स पूर्णपणे अॅडजस्टेबल गॅस-चार्ज्ड मोनोशॉक आणि बरेच काही आहे. बाईकमध्ये तेच २१० सीसी इंजिन आहे परंतु त्यात जास्त पॉवर आणि टॉर्क असू शकतो. ही बाईक खूपच दुर्मिळ आहे आणि प्रत्येक युनिटची किंमत १३ लाख रुपये आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Splendor चालवणाऱ्या बाप-लेकाला Hero दिली 13 लाखांची स्पोर्ट Bike गिफ्ट, कारण आहे खास?
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement