जगात भारी, कोल्हापूर सुंदरी! 5 स्टार हॉटेलची रूम नाही, ही तर रिक्षा; सुविधा पाहिल्या का?

Last Updated:

Kolhapur Sundari: एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या रुमपेक्षा भारी सुविधा कोल्हापुरातील एका रिक्षात मिळतात. गडहिंग्लजमधील रमेश गंधवाले यांची ही कोल्हापूर सुंदरी रिक्षा आहे.

+
जगात

जगात भारी, कोल्हापूर सुंदरी! 5 स्टार हॉटेलची रूम नाही, ही तर रिक्षा; सुविधा पाहिल्या का?

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : झुंबर, लाइटिंग, फॅन्स, स्मोक डिटेक्टर, ऑक्सिजन टॅंक, कॅमेरे, एलसीडी स्क्रीन, फर्स्ट एड बॉक्स, इतकच नव्हे तर फ्रिजची देखील सोय.. या सगळ्या सुविधा कुठल्या आलिशन 5 स्टार हॉटेलमधल्या नाहीत. कोल्हापुरातील एका हौशी रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात या सुविधा दिल्या आहेत. विशेष म्हणजे जशी ही रिक्षा आतून सर्व सोयीसुविधांनीयुक्त आहे, अगदी तशाच पद्धतीने बाहेरून देखील सजवण्यात आले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील रमेश गंधवाले यांची ही कोल्हापूर सुंदरी रिक्षा असून त्यासाठी साडेचार लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाये.
advertisement
कोल्हापुरात महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रिक्षा सौंदर्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित स्पर्धा नुकत्या झाल्या. या स्पर्धेत शेकडो रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील रमेश गंधवाले यांच्या रिक्षाला ‘कोल्हापूर सुंदरी’ असा मानाचा पुरस्कार मिळाला.
advertisement
या रिक्षाची वैशिष्ट्ये काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये असणारे रिक्षा चालक रमेश गंधवाले यांच्या रिक्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सोयीसुविधा पुरवल्या आहेत. यात त्यांनी प्रवाशांच्या सोयींची पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये आरामदायी सीट, कॅमेरे, फर्स्ट एड बॉक्स, लहान मुलांसाठी चॉकलेट, पावडर, पेन पेन्सिल आणि त्यासोबतच अत्याधुनिक सोयी सुविधा दिल्या आहेत. या अत्याधुनिक सोयी सुविधांमध्ये एलसीडी, फ्रिज, जीपीएस, कॅमेरे, फॅन्स, वायफाय अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा आहेत.
advertisement
रिक्षात सामाजिक संदेश
रमेश यांनी रिक्षात अत्याधुनिक सुविधांसोबतच काही खास संदेश देखील दिले आहेत. यात कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश केलाय. त्यासोबतच छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेसोबत राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची प्रतिमा लावण्यात आली आहे. त्यासोबतच स्थानिक गडिंग्लज मध्ये असल्याकारणाने इमर्जन्सी नंबर्स, पोलीस स्टेशन नंबर, महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी आणि बरंच काही या रिक्षात देण्यात आलंय.
advertisement
साडेचार लाख रुपये खर्च..! 
गंधवाले यांच्या रिक्षाला कोल्हापुर सुंदरी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. पण त्यांनी केलेली ही सजावट प्रवाशांना मोहित करून टाकते. त्यांनी या रिक्षासाठी तब्बल साडेचार लाखांचा खर्च केला आहे. साडेचार लाख रुपयांच्या खर्चामुळे या रिक्षेला एक विलक्षण आधुनिक रुप मिळाले आहे. या रिक्षात बसलेल्या प्रवाशांना एक आरामदायक अनुभव मिळतो. तसेच अशा ऐतिहासिक वाटणाऱ्या रिक्षात बसून एक वेगळंच समाधान मिळत अल्याचे प्रवासी सांगतात.
मराठी बातम्या/ऑटो/
जगात भारी, कोल्हापूर सुंदरी! 5 स्टार हॉटेलची रूम नाही, ही तर रिक्षा; सुविधा पाहिल्या का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement