Thar चा पडेल विसर, महिंद्रा आणतेय आजपर्यंत न पाहिलेल्या अशा धाकड SUV, फोटो पाहून पडाल प्रेमात

Last Updated:

महिंद्रा अँड महिंद्राने आतापर्यंत अनेक दणकट आणि दमदार अशा एसयूव्ही लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. ईव्ही असो किंवा एसयूव्ही व्हर्जन, महिंद्राने आपलं वेगळं पण राखून आहे.

News18
News18
महिंद्रा अँड महिंद्राने आतापर्यंत अनेक दणकट आणि दमदार अशा एसयूव्ही लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. ईव्ही असो किंवा एसयूव्ही व्हर्जन, महिंद्राने आपलं वेगळं पण राखून आहे. त्यामुळे मासिक विक्रीच्या आधारावर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून समोर आली आहे. पण आता महिंद्रा पुढंच पाऊल टाकत आहे. कंपनी तिच्या अतिशय लोकप्रिय स्कॉर्पिओ एनवर आधारित तिच्या नवीन पिकअप ट्रकची चाचणी सुरू केली आहे. हा पिक-अप ट्रक भारतातील रस्त्यावर चाचणी दरम्यान दिसला आहे. त्यामुळे लवकरच पिक ट्रकची सीरिज लाँच होण्याची चिन्ह आहे.
अमेरिका आणि युरोपमध्ये पिक-अप ट्रकचं मोठं मार्केट आहे. ग्रामीण आणि शहरीभागामध्ये पिकअप-ट्रकची चांगली लोकप्रियता आहे. त्यामुळे महिंद्रा पिक-अप ट्रकवर मागील काही वर्षांपासून काम करत आहे. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पिक-अप कॉन्सेप्ट शोमध्ये महिंद्राने आपल्या पिकअप ट्रकची झलक दाखवली होती. या पिकअप ट्रकचं उत्पादन नाशिकमध्ये केलंय. हा पिकअप ट्रक नव्या स्कॉर्पिओ एनवर आधारित आहे आणि त्यात स्कॉर्पिओ गेटवेसारखे नवीन चौरस-पॅटर्न फ्रंट ग्रिल आणि टेल लॅम्प आहेत. मागील दिवे हॅलोजन आहेत, परंतु उत्पादन-तयार मॉडेलमध्ये एलईडी टेललाइट्स असण्याची अपेक्षा आहे. पिकअप ट्रकमध्ये शार्क अँटेना आणि ओपन बूट स्पेस आहे.
advertisement
सिंगल आणि डबल-केबिन 
महिंद्राच्या या पिकअप ट्रकची सध्या चाचणी सुरू आहे, त्याचे फोटो समोर आले आहे, यामध्ये स्कॉर्पिओ एन पिक-अप ट्रक सिंगल आणि डबल-केबिन व्हर्जनमध्ये येईल अशी चिन्ह आहे. चाचणी म्यूल खूप झाकलेला होता आणि हेडलाइट्स स्कॉर्पिओ एन पेक्षा वेगळ्या दिसत होत्या. स्पाय व्हिडिओनुसार, पिक-अप ट्रकचा केबिन थ्रॅक्स रॉक्ससारखा दिसतो. पिक-अप ट्रकच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ट्विन १०.२५-इंच डिस्प्ले, एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, १२ व्ही सॉकेट, मागील पार्किंग सेन्सर्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आणि लॉग लॅम्प्स सारखी फिचर्स दिले आहे.
advertisement
२ इंजिन ऑप्शन
सुरक्षिततेच्या दृष्टीने, महिंद्राचे पिकअप ट्रक हे इंटरनॅशनल बाजारातले आहे, म्हणून त्यात प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, एअरबॅग्ज आणि ४-व्हील-ड्राइव्ह सिस्टम असावी. स्कॉर्पिओ एन पिक-अप ट्रक दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. २.०-लिटर पेट्रोल आणि २.२-लिटर डिझेल ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह अनेक पॉवर आउटपुटसह उपलब्ध असू शकते आणि पार्ट-टाइम ४WD सिस्टम असू शकते.
मराठी बातम्या/ऑटो/
Thar चा पडेल विसर, महिंद्रा आणतेय आजपर्यंत न पाहिलेल्या अशा धाकड SUV, फोटो पाहून पडाल प्रेमात
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement