Mahindra Vision T: महिंद्रा 15 ऑगस्टला करणार धमाका, आणतेय नव्या Thar सह 5 SUV

Last Updated:

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आता ऑगस्ट महिन्यात नवीन धमका करणार आहे.

News18
News18
मुंबई : भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आता ऑगस्ट महिन्यात नवीन धमका करणार आहे. लवकरच महिंद्रा आपल्या नवीन एसयूव्हीची सीरिज लाँच करणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमामध्ये  एक दोन नव्हे तर ५ एसयूव्ही लाँच करणार आहे.  महिंद्राने या गाड्यांबद्दल  टीझर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे. ज्यात त्यांच्या सिल्हूटपासून डिझाइनपर्यंत काही माहिती समजून येत आहे.  १५ ऑगस्ट २०२५ रोजी, कॉन्सेप्ट SUV, Vision T, Vision S, Vision SXT आणि Vision X लाँच करणार आहे. महिंद्राची नवीन आर्किटेक्चर ‘Freedom NU' देखील लाँच होणार आहे.  याशिवाय, या कार्यक्रमात अपडेटेड बोलेरो निओ एसयूव्ही देखील पाहण्यास मिळेल.
महिंद्रा Vision T
महिंद्रा Vision T कॉन्सेप्ट Thar.e इलेक्ट्रिकवर आधारित असू शकते. ज्यामध्ये चौकोनी बोनेट, व्हील आर्च आणि सर्व रस्त्यावर धावणाऱ्या एसयूव्ही असणार आहे. , Vision X कॉन्सेप्ट XEV 9e कूप एसयूव्हीची नवं व्हेरिएंट असणार आहे.जी जवळजवळ उत्पादन मॉडेल असेल. ही आगामी महिंद्रा XEV 7e 7-सीटर इलेक्ट्रिक SUV असू शकते, जी आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. व्हिजन S आणि SXT ही स्कॉर्पिओ N आणि स्कॉर्पिओ N-आधारित पिकअप ट्रकची कॉन्सेप्ट असण्याची शक्यता आहे.
advertisement
2025 महिंद्रा बोलेरो निओ
अपडेट केलेली बोलेरो निओ 15 ऑगस्ट रोजी पाहण्यास मिळेल.  व्हायरल झालेल्या फोटोवरून SUV मध्ये पूर्णपणे नवीन बॉडी पॅनेल, Thar Roxx-प्रेरित गोल हेडलॅम्प, नवीन LED फॉग लॅम्प असेल. XUV700 वरून नवीन डिझाइन केलेले मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स कॅरी ओव्हर केले जातील. हुड अंतर्गत, 2025 महिंद्रा बोलेरो निओमध्ये सध्याचे 100bhp, 1.5L, 3-सिलेंडर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे.
advertisement
नवीन महिंद्रा प्लॅटफॉर्म
मुंबईस्थित ऑटोमेकर त्यांचे नवीन  ‘Freedom NU’ प्लॅटफॉर्म देखील लाँच करेल, जे २०२६ मध्ये नवीन जनरेशनच्या बोलेरो SUV वर लाँच करेल. हे नवीन आर्किटेक्चर बहुधा एक मोनोकोक प्लॅटफॉर्म असेल, जे पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिकसह अनेक पॉवरट्रेनसाठी योग्य असेल.
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra Vision T: महिंद्रा 15 ऑगस्टला करणार धमाका, आणतेय नव्या Thar सह 5 SUV
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement