Maruti देणार टक्कर, येतेय सर्वात स्वस्त आणि मस्त अशी 7 सीटर फॅमिली SUV, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
आता निसान पुन्हा एकदा भारतात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच निसानने एक ७ सीटर एसयुव्ही तयार केली आहे.
भारतीय मार्केटमध्ये कधीकाळी जपानी कंपनी निसान मोटर्सचा मोठा दबदबा होता. मध्यंतरी अचानक ही कंपनीचे उत्पादन थांबले होते. पण आता निसान पुन्हा एकदा भारतात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच निसानने एक ७ सीटर एसयुव्ही तयार केली आहे. या एसयुव्हीची झलक पाहण्यास मिळाली आहे. निसानची ही एक फॅमिली कार असणार आहे. त्यामुळे या कारची थेट टक्कर सुझुकी मारूतीसोबत असणार आहे.
निसान इंडियाने या नव्या ७ सीटर एसयुव्हीचा नवीन टीझर व्हिडिओ जारी केला आहे. निसानने अद्याप कारचे नाव आणि तपशील शेअर केलेली नाही. पण ही कार रेनॉल्ट ट्रायबरवर आधारित ७-सीटर फॅमिली कार असण्याची शक्यता आहे. निसानने यापूर्वी भारतासाठी एक नवीन कॉम्पॅक्ट एमपीव्ही लाँच करण्याची तयारी केली होती, जी ट्रायबरसह प्लॅटफॉर्म, फिचर्स आणि इंजिनवर आहे. फ्रेंच ऑटोमेकरने अलीकडेच २०२५ रेनॉल्ट ट्रायबर लाँच केले आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण फीचर अपग्रेड आणि नवीन डिझाइन बदल आहेत.
advertisement
निसानची नवीन सबकॉम्पॅक्ट एमपीव्ही पूर्वी नवीन मिडसाईज एसयूव्हीसह टीझर करण्यात आलं होतं, जी तिसऱ्या-जनरेशन रेनॉल्ट डस्टरवर आधारित असेल. अधिकृत टीझरमध्ये एमपीव्हीच्या फ्रंट फॅसियाची झलक दिसते. ज्यामध्ये निसानची सिग्नेचर ग्रिल, सिल्व्हर रॅपअराउंड ट्रीटमेंटसह स्पोर्टी बंपर, नवीन एलईडी डीआरएल, फंक्शनल रूफ रेल आणि नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्सचा समावेश आहेत. ७-सीटर फॅमिली कार ट्रायबरपेक्षा वेगळी दिसणार असली तरी, दोन्ही मॉडेल्सचे फिचर्स हे एक सारखेच असण्याची शक्यता आहे. रेनॉल्टच्या एमपीव्हीची लांबी ३,९९० मिमी, रुंदी १,७३९ मिमी आणि उंची १,६४३ मिमी आहे.
advertisement
advertisement
निसानची नवीन ७-सीटर त्याची पॉवरट्रेन रेनॉल्ट ट्रायबरकडून घेणार आहे. ट्रायबरमध्ये १.० लीटर, ३-सिलेंडर, एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एएमटी युनिट समाविष्ट आहे.
किती असेल किंमत?
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, ही फॅमिली कार भारतातील सर्वात परवडणारी ७-सीटरपैकी एक असेल. किंमती सुमारे ६.५ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन रेनॉल्ट ट्रायबर सध्या ६.३० लाख ते ९.१७ लाख रुपये (सर्व, एक्स-शोरूम) या किंमतीत उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti देणार टक्कर, येतेय सर्वात स्वस्त आणि मस्त अशी 7 सीटर फॅमिली SUV, किंमतही कमी