सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर या महिन्यात होणार लॉन्च! अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकला देणार टक्कर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.1kWची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 15Nmचा पीक टॉर्क देते. यात 3.07kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देखील आणण्यात आला आहे. जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 95km पर्यंतची रेंज देईल.
मुंबई : सुझुकी मोटरसायकल इंडियाने यावर्षी ऑटो एक्स्पो 2025 मध्ये भारतातील पहिले इलेक्ट्रिक स्कूटर, ई-अॅक्सेस सादर केले. त्याच्या प्रीमियम आणि आकर्षक डिझाइनमुळे, ही स्कूटर अनेकांना आवडली. पण त्यावेळी या स्कूटरची किंमत जाहीर करण्यात आली नव्हती. पण आता बातमी येत आहे की, कंपनी या महिन्यात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. ही स्कूटर थेट होंडा इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा, टीव्हीएस आयक्यूब, ओला इलेक्ट्रिक आणि एथरशी स्पर्धा करेल. त्याची संभाव्य किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.
बॅटरी आणि रेंज
सुझुकी ई-अॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.1kWची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 15Nmचा पीक टॉर्क देते. यात 3.07kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देखील आणण्यात आला आहे. जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 95km पर्यंतची रेंज देईल. त्याचा टॉप स्पीड 71kmph आहे. पोर्टेबल चार्जर वापरून ई-अॅक्सेस 0 ते 100% पर्यंत चार्ज करण्यासाठी 6 तास 42 मिनिटे लागतात. फास्ट चार्जरच्या मदतीने ते फक्त 2 तास 12 मिनिटांत चार्ज करता येते.
advertisement
फीचर्स आणि किंमत
सुझुकी ई-अॅक्सेस स्कूटर तीन ड्युअल-टोन कलर स्कीममध्ये खरेदी करता येईल. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2/मेटॅलिक मॅट बोर्डो रेड, पर्ल ग्रेस व्हाइट/मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल जेड ग्रीन/मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे रंग ऑप्शनचा समावेश आहे. त्याची रचना स्मार्ट आहे जी तरुणांना आवडेल. स्कूटरची सीट आरामदायी आहे.
advertisement
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, स्कूटरमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. ज्यामध्ये ओडोमीटर, रेंज, बॅटरी, ट्रिपमीटर आणि इतर मूलभूत फीचर्स उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ट्रॅफिक अपडेट्सचा समावेश आहे. ई-अॅक्सेसमध्ये तीन राईड मोड्स आहेत - इको, राईड ए आणि राईड बी. त्यात एक फोब देखील आहे. ज्याद्वारे स्कूटरला दूरवरून लॉक/अनलॉक करता येते. खराब रस्त्यांसाठी, त्यात टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील्स आहेत. त्याची सीट उंची 765mm, ग्राउंड क्लिअरन्स 165mm आणि कर्ब वेट 122kg आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.20 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर या महिन्यात होणार लॉन्च! अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकला देणार टक्कर