Yamaha ची 'ती' बाइक झाली तयार, तब्बल 30 वर्षांनंतर तुफान परत येतंय!
- Published by:sachin Salve
Last Updated:
दमदार पिकअप आणि जबरदस्त आवाज... ही बाइक जर रस्त्याने गेली तर कुणीही सांगेल की ही यामाहाची RX 100 होती. यामाहाच्या RX100 हे फक्त एका बाइकचं नाव नव्हतं तर एक दहशत होती.
दमदार पिकअप आणि जबरदस्त आवाज... ही बाइक जर रस्त्याने गेली तर कुणीही सांगेल की ही यामाहाची RX 100 होती. यामाहाच्या RX100 हे फक्त एका बाइकचं नाव नव्हतं तर एक दहशत होती. RX100 च्या पुढे बुलेट काय आणि दुसरं कुणीही काय कधीच स्पर्धा करू शकलं नाही. १९८५ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आलेली ही टू-स्ट्रोक बाईक तिच्या कामगिरी, चपळता आणि उत्तम एक्झॉस्ट आवाजासाठी ओळखली जात होती. ज्यामुळे देशभरात या बाइकचा दबदबा होता. आता दशकांनंतर, RX100 पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
advertisement
जुनी यामाहा RX100 नोव्हेंबर १९८५ मध्ये लाँच झालेली, यामाहा RX100 ही भारतीय मोटरसायकल बाजारपेठेत एक नवीन क्रांती घडवून आणणारी ठरली. ९८ सीसी एअर-कूल्ड, रीड व्हॉल्व्ह टू-स्ट्रोक सिंगल इंजिन असून ११.२ एचपी आणि १०.३९ एनएम टॉर्क निर्माण करते. या ताकदीमुळे त्याच्या हलक्या वजनाच्या फ्रेममुळे रायडर्सना एक रोमांचक अनुभव मिळाला. ज्यामुळे बाईक सुमारे ७.५ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग घेऊ शकली. RX100 चा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास होता, ज्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आरएक्स१०० २०२५ मध्ये परत येत असल्यामुळे साहजिक तरुणांमध्ये चांगलाच उत्साह आहे. आयकॉनिक RX100 पुन्हा एकदा परत येत आहे, पण यावेळी ती टूस्ट्रोक इंजिनसह येणार नाही. वाढत्या प्रदुषणामुळे केंद्र सरकारने ट्रू स्ट्रोक इंजिन गाड्यांवर बंदी आणली. त्यामुळे नवीन बाईक ही फोर स्ट्रोक इंजिनसह येईल. नवीन RX100 मध्ये कमी सीसीचं इंजिन दिलं आहे. त्यामुळे साहजिक जास्त मायलेजची अपेक्षा असणार आहे.
advertisement
advertisement
नव्या RX100 चं इंजिन: ही बाईक ९८ सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे ज्याचे पॉवर आउटपुट सुमारे १०.८५ पीएस @ १०,००० आरपीएम आहे. टॉर्क: १०.३९ एनएम @ ७,५०० आरपीएम जे सध्याच्या काळातही दमदार आहे. यामाहा कंपनीने बाइकची तयारी पूर्ण केली आहे. पण अधिकृतरित्या कधी लाँच करणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.