10 हजारांच्या EMIवर Tata Punch EV खरेदी केली? डाउन पेमेंट किती भरावी लागेल? पाहा हिशोब

Last Updated:

Tata Punch EV: टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, पंच ईव्ही पूर्ण चार्ज केल्यावर 315 किमी ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. तसेच, ती जास्तीत जास्त 140 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

टाटा पंच ईव्ही
टाटा पंच ईव्ही
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी हळूहळू वाढत आहे. यामुळेच कार उत्पादक अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. टाटा मोटर्स या विभागात चांगले काम करत आहे. जर तुम्ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला टाटाच्या सर्वोत्तम ईव्हीबद्दल सांगणार आहोत, जी परवडणारी आहे आणि सर्वोत्तम फीचर्स देखील आहेत.
Tata Punch EVची ऑन-रोड किंमत काय आहे?
आपण ज्या कारबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणतीही नसून Tata Punch EV आहे. या कारची ऑन-रोड किंमत जवळपास 10 लाख 55 हजार रुपये आहे. तुम्ही ही कार 4 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन खरेदी केली तर उर्वरित 6.55 लाख रुपये बँकेकडून कार कर्ज म्हणून घ्यावे लागतील. जर तुम्हाला ही रक्कम 5 वर्षांसाठी 8 टक्के वार्षिक व्याजदराने मिळाली तर ईएमआय सुमारे 13-14 हजार रुपये असेल.
advertisement
तुम्ही कर्जाचा कालावधी 7 वर्षांचा केला तर हप्त्याची रक्कम सुमारे 10 हजारांपर्यंत कमी होईल. कारवर कर्ज घेणे तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. यासोबतच, शहरे आणि डीलरशिपनुसार ऑन-रोड किंमत देखील बदलू शकते.
advertisement
Tata Punch EVचे स्पेसिफिकेशन आणि इंजिन
टाटा मोटर्सच्या पंच ईव्हीमध्ये 25 kWh प्रति तास क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक वापरला जातो. कंपनीचा दावा आहे की, हा बॅटरी पॅक एसी चार्जरने 3.6 तासांत 10 ते 100 टक्के आणि डीसी फास्ट चार्जरने 56 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येतो.
advertisement
टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर, पंच ईव्ही 315 किमी ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. तसेच, ते कमाल 140 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. कंपनीच्या मते, पंच ईव्हीला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी 9.5 सेकंद लागतात.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
10 हजारांच्या EMIवर Tata Punch EV खरेदी केली? डाउन पेमेंट किती भरावी लागेल? पाहा हिशोब
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement