Tesla:अखेर ड्रायव्हरलेस कार भारतात आलीच! टेस्लाचं शोरूम मुंबईत झालं सुरू, हे मॉडेल विक्रीला!
- Published by:Sachin S
Last Updated:
आरटीओकडून टेस्लाला त्यांच्या गाड्यांना प्रदर्शित करण्यासाठी, टेस्ट ड्राइव्ह आणि विक्री सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे.
मुंबई : बहुप्रतिक्षित टेस्ला कार अखेर भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची वेळ आली आहे. टेस्लाने अखेरीस सर्व परवानग्या मिळवल्या असून भारतात पहिला शोरूम १५ जुलै २०२५ रोजी मुंबईत सुरू होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचा पहिला शोरूम उघडलं आहे. नवीन टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटरमध्ये अमेरिकन फेमस EV ब्रँड प्रत्यक्षात पाहण्यास मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून टेस्लाकडून शोरूम उघडण्याची हालचाल सुरू झाली होती. मधल्या काळात मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टेस्लाच्या मॉडेलची चाचणीही घेण्यात आली होती. टेस्लाला आरटीओकडून त्यांच्या गाड्यांना प्रदर्शित करण्यासाठी, टेस्ट ड्राइव्ह देण्यासाठी आणि विक्री सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे. अंधेरी आरटीओने इंटरनॅशनल ईव्ही बँड टेस्लाला 'ट्रेड सर्टिफिकेट' दिलं आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या कलम ३५ अंतर्गत जारी केलेले ट्रेड सर्टिफिकेट नोंदणी नसलेल्या वाहनांना सार्वजनिक रस्त्यावर धावण्याची परवानगी देखील देते.
advertisement
टेस्ला Y मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध
टेस्लाचं मॉडेल Y हे भारतात विक्रीसाठी पहिलं टेस्ला मॉडेल असणार आहे. देशात इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरसाठी पेटंट आणि ट्रेडमार्क आधीच दाखल केलं गेलं आहेत. याशिवाय, अलिकडच्या काही महिन्यांत मॉडेल वाय अनेक वेळा भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसले आहे. मॉडेल Y जागतिक स्तरावर दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - लाँग रेंज रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) आणि लाँग रेंज ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD).
advertisement
574 किमी (EPA) रेंज
लाँग रेंज RWD प्रकार ५७४ किमी (EPA) रेंज देतो आणि ५.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. या कारमध्ये दोन मोटर्सने सुसज्ज असलेले लाँग रेंज AWD मॉडेल ५२७ किमी रेंज देते आणि ४.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते. मॉडेल Y मुंबईत दाखल ब्लूमबर्गच्या अहवालात असं दिसून आलं आहे की, भारतात बनवलेल्या पाच टेस्ला मॉडेल Y SUV आधीच मुंबईत आल्या आहेत. अधिकृत नोंदी दर्शवितात की प्रत्येक मॉडेल Y ची किंमत सुमारे २७.७ लाख (सुमारे $३१,९८८) इतकी असणार आहे. तसंच, भारतात ४०,००० डॉलरपेक्षा कमी किमतीच्या पूर्णपणे एकत्रित इलेक्ट्रिक वाहनांवर ७०% आयात शुल्क देखील आकारलं जातंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Tesla:अखेर ड्रायव्हरलेस कार भारतात आलीच! टेस्लाचं शोरूम मुंबईत झालं सुरू, हे मॉडेल विक्रीला!