TVS ने आणली कधी न पाहिलेली सुपर स्कुटर, M1-S चा लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:

मागील अनेक वर्षांपासून टीव्हीएसने नव नवीन बदल करून शानदार आणि दमदार अशा स्कुटर आणि बाइक लाँच केल्या आहेत , आता पुन्हा एकदा टीव्हीएस मोटर्स...

News18
News18
TVS M1-S: भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी म्हणून टीव्हीएस मोटर्सला ओळखलं जातं. मागील अनेक वर्षांपासून टीव्हीएसने नव नवीन बदल करून शानदार आणि दमदार अशा स्कुटर आणि बाइक लाँच केल्या आहेत , आता पुन्हा एकदा टीव्हीएस मोटर्स आणखी एक नवीन स्कुटर मार्केटमध्ये आणणार आहे. टीव्हीएसकडून M1-S नावाची स्कुटरचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये या स्कुटरला वेगळा असा लूक आहे याा स्कुटरमध्ये 4.3 KWH ची बॅटरी दिली आहे.
TVS M1-S ही एक EV स्कूटर आहे. टीव्हीएसची ही पहिली मॅक्सी स्टाइल स्कुटर आहे. ही स्कूटर एक EV स्टार्टअप ION Mobility च्या ION M1-S आहे. खरंतर टीव्हीएस मोटर्सने ION मध्ये सध्ये गुंतवणूक केली आहे. एवढंच नाहीतर TVS ने ION च्या टीमला सुद्धा सोबत घेतलं आहे. कंपनीने हा निर्णय 'Reimagine 2030
advertisement
व्हिजनसाठी घेतला आहे.
फिचर्स आणि डिझाईन
TVS M1-S चे फिचर्स दमदार आणि चांगले आहे. या स्कुटरमध्ये LED DRLs आणि २ हेड लाइट आणि एक लांब विंडस्क्रीन दिली आहे. स्कुटरमध्ये ७ इंचाचा डिजीटल स्पीडोमिटर दिला आहे. जो स्मार्ट फिचर्सने सज्ज आहे. या स्कुटरमध्ये २६ लिटर सीट खाली स्टोरेज स्पेस दिला आहे. ज्यामुळे जास्त सामना ठेवता येईल.
advertisement
TVS च्याा M1-S स्कूटरमध्ये 4.3 kWh ची बॅटरी दिली आहे. जी 12.5 kW इतका पॉवर आणि 254 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. कंपनीने सांगितलं आहे की स्कुटर फक्त 3.7 सेकंदात  0-50 m/hr इतका स्पीड गाठू शकते. ही स्कूटर  फुल चार्ज केल्यानंतर जवळपास 150 किमी इतकी रेंज देऊ शकतो. या स्कुटरचं वजनही कमी असून जवळपास 152 किलो इतकं आहे. सध्याा ही स्कुटर  इंडोनेशियामध्ये लवकरच लाँच होणार आहे. पण TVS M1-S लवकरच भारताही लाँच होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
TVS ने आणली कधी न पाहिलेली सुपर स्कुटर, M1-S चा लूक पाहून पडाल प्रेमात!
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement