E Bike: काय सांगता! फक्त 39 हजारात मिळतेय नवी कोरी इलेक्ट्रिक गाडी, कुठे? हे पाहा...
- Published by:
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
E Bike: नाशिक शहरातील रोहन मोटर्स यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी 'व्हिक्टर इलेक्ट्रिक स्कूटी' विक्रीसाठी आणली आहे.
नाशिक: ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पृथ्वीवरील पर्यावरणीय समतोलाला झालेली हानी आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल हा नवीन पर्याय समोर आला आहे. अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणली आहेत. साधारणपणे एका इलेक्ट्रिक टूव्हीलरची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र, नाशिकमध्ये फक्त 39 हजारात ब्रँड न्यू इलेक्ट्रिक मोपेड (स्कूटी) गाडी खरेदी करता येणार आहे.
नाशिक शहरातील रोहन मोटर्स यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी 'व्हिक्टर इलेक्ट्रिक स्कूटी' विक्रीसाठी आणली आहे. ही गाडी वजनाला अतिशय हलकी आणि खिशालाही परवडणारी असल्यामुळे नाशिकरांच्या नजरा या गाडीकडे वळल्या आहेत.
गाडी खरेदीसाठी उपलब्ध ऑफर्स
नाशिकरांना कोणतेही एक्ट्रा टॅक्स न भरता व्हिक्टर एपिक 2.0 ही गाडी फक्त 39 हजार रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. गाडीच्या बॅटरी सोबत एका वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. गाडीच्या फायबर बॉडीची रुंदी 5 एमएम असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. याशिवाय गाडीसोबत तीन हजार रुपयांच्या अॅक्सेसरीज देखील मोफत मिळत आहेत. 3 वर्षांच्या वॉरंटीसह मिळणाऱ्या या गाडीची मिनीमम रेंज 50 किलोमीटर असून मॅक्सिमम रेंज 200 किलोमीटर आहे.
advertisement
गाडीचे फीचर्स
या गाडीमध्ये फुल डिजिटल डिस्प्ले, एबीएस ब्रेक सिस्टीम, डिस्कब्रेक, LED लँप रिव्हर्स सिस्टीम, क्रुझ मोड, अँटी थेप्ट लॉकिंग सिस्टीम यांसारखी अत्याधुनिक फीचर्स आहेत. त्यामुळे गाडी चोरीला जाण्याचा धोका नाही. ही गाडी लिडएसी बॅटरी (50 किलोमीटर रेंज) आणि लिथियम बॅटरी (200 किलोमीटर रेंज) अशा दोन प्रकारच्या बॅटरी सह मिळते. या बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त 2 यूनिट खर्च करावे लागणार आहेत. गाडीवर दोन व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात. याशिवाय सीट खाली 50 लिटर क्षमतेचा डिक्की स्पेस आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 02, 2025 2:48 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
E Bike: काय सांगता! फक्त 39 हजारात मिळतेय नवी कोरी इलेक्ट्रिक गाडी, कुठे? हे पाहा...