BJP Shivsena Shinde : राज्यात दोस्ती, वॉर्डात कुस्ती! BJP कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचलं; "५० खोके"च्या घोषणांनी राजकारण तापलं

Last Updated:

BJP vs Shiv Sena Shinde: प्रचाराच्या दरम्यान शिंदे गटाला भाजपच्या कार्यकर्त्यानी डिवचलं. "५० खोके, एकदम ओके" अशा घोषणा देत भाजपने शिंदे गटावर निशाणा साधला. या प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे

राज्यात दोस्ती, वॉर्डात कुस्ती! BJP कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचलं; "५० खोके"च्या घोषणांनी राजकारण तापलं
राज्यात दोस्ती, वॉर्डात कुस्ती! BJP कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचलं; "५० खोके"च्या घोषणांनी राजकारण तापलं
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच, महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. शीव-कोळीवाडामधील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत थेट संघर्ष पाहायला दिसत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांमध्ये लढत आहे. शिंदे गटाला सोडलेल्या जागेवर नाट्यमयरीत्या भाजपचा उमेदवार आहे. प्रचाराच्या दरम्यान शिंदे गटाला भाजपच्या कार्यकर्त्यानी डिवचलं. "५० खोके, एकदम ओके" अशा घोषणा देत भाजपने शिंदे गटावर निशाणा साधला. या प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर या रिंगणात आहेत, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूजा कांबळे या निवडणूक लढवत आहेत. वास्तविक, महायुतीमध्ये हा वॉर्ड शिंदे गटाला सोडण्यात आला होता. मात्र, शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या 'एबी' फॉर्मची कलर झेरॉक्स प्रत वापरून आपला अर्ज दाखल केला. हा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवला आहे. परिणामी, येथे अधिकृतपणे 'कमळ' विरुद्ध 'धनुष्यबाण' असा सामना रंगला आहे.
advertisement

भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी...

भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिल्पा केळुसकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना शिंदे गटावर बोचरी टीका केली. विशेष म्हणजे, ज्या घोषणांमुळे आजवर उद्धव ठाकरे गट शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न करत होता, त्याच "५० खोके, एकदम ओके" अशा घोषणा आता भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष मुंबईतील या वॉर्डमध्ये मात्र एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी शिल्पा केळुसकर यांच्या उमेदवारीपासून अंतर राखले असले, तरी स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याच प्रचारात सक्रिय आहेत. या वादामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
BJP Shivsena Shinde : राज्यात दोस्ती, वॉर्डात कुस्ती! BJP कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचलं; "५० खोके"च्या घोषणांनी राजकारण तापलं
Next Article
advertisement
परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement