Asangaon to Kasara Local : आसनगाव, कसारा प्रवाशांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेचा एक निर्णय अन् लोकलचा खोळंबा टळणार
Last Updated:
Kalyan to Kasara New Railway Line : कल्याण ते कसारा दरम्यान नवीन स्वतंत्र रेल्वे मार्गिका उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लोकल सेवेत वाढ होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेवर होणार आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. कल्याण ते कर्जतदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या कामानंतर आता कल्याण ते कसारा दरम्यान लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका विकसित करण्यात येणार आहेत. आसनगाव ते कसारा चौथ्या मार्गिकेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
आसनगाव-कसारा प्रवाशांचा प्रवास आता वेगवान होणार
सध्या उपनगरी मार्गावरून लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक गाड्या एकाच मार्गिकेवरून धावत असल्याने वेळापत्रक कोलमडते आणि लोकल सेवा वारंवार खोळंबते. नव्या स्वतंत्र मार्गिकांमुळे मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचे योग्य नियोजन करता येणार असून लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एमयूटीपी 3-अ अंतर्गत कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका उभारण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत – कल्याण ते आसनगाव आणि आसनगाव ते कसारा पूर्ण केला जाणार आहे. यातील कल्याण ते आसनगाव हा भाग मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत राबवला जात असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
लोकल प्रवाशांच्या सातत्याने होत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन लाखो मुंबईकरांनी कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत मार्गावर स्वतंत्र मार्गिकांची मागणी केली होती. त्यानुसार 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण ते कर्जत दरम्यान अतिरिक्त दोन मार्गिकांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
एमयूटीपी 3-ब अंतर्गत बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा हे दोन्ही प्रकल्प सर्व मंजुरी मिळत असल्याने पुढे जात आहेत. याशिवाय पनवेल-वसई उपनगरी मार्गालाही लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Asangaon to Kasara Local : आसनगाव, कसारा प्रवाशांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेचा एक निर्णय अन् लोकलचा खोळंबा टळणार









