EV कार घेताय सावधान! अपघातानंतर कारचं दार उघडलंच नाही, चालकाचा जळून कोळसा, घटनेचा VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
अशातच जगप्रसिद्ध Xiaomi कंपनीच्या कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कारला आग लागल्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला
सध्या ईलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. इंधनाचे वाढते दर आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ईलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पण, ईलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत आहे. अशातच जगप्रसिद्ध Xiaomi कंपनीच्या कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कारला आग लागल्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर Xiaomi च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील चेंगडू शहरात ही घटना घडली आहे. चीनमध्ये सर्वाधिक मोबाईल विक्रेता कंपनीने अलीकडेच Xiaomi ची ईलेक्ट्रिक कार लाँच केली होती. Xiaomi su7 असं या कारचं नाव आहे. चेंगडू शहरात Xiaomi su7 चा भीषण अपघात झाला. कारवरून चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर कार डिव्हायडरला धडकली आणि आग लागली.
A driver in China died after crashing his Xiaomi SU7 electric vehicle, which caught fire.
Following a power failure, the doors locked and rescue attempts failed.
Xiaomi shares fell about 9% after the incident.pic.twitter.com/zEQ44vJENJ
— Clash Report (@clashreport) October 13, 2025
advertisement
कारला आग लागल्यामुळे कार लाँक झाली. घटनास्थळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, लोक चालकाला वाचवण्यासाठी दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण दरवाजे अजिबात हलत नव्हते. नंतर कोणीतरी आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कारमध्येच 31 वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे Xiaomi su7 च्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
कारचे दरवाजे लाॅक का झाले?
सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की, “चीनमधील एका ड्रायव्हरचा त्याच्या Xiaomi su7 इलेक्ट्रिक कारचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. कारचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, दरवाजे बंद झाले आणि त्यामुळे त्याला बाहेर पडता आलं नाही. लोकांनाही त्याला बाहेर काढता आलं नाही". या घटनेनंतर शाओमीचे शेअर्स सुमारे ९% घसरले.
advertisement
भरधाव वेगात होती कार
तर स्थानिक रहिवाशी झाओ किंग या रहिवाशाने द पेपरला दिलेल्या माहितीनुसार, चालक Xiaomi su7 कार भरधाव वेगात चालवत होता. “मी जवळच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर होतो आणि पहाटे ३:१० च्या सुमारास ही घटना घडली. मी आणि माझा मित्र ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. सुरुवातीला, घटनास्थळी चार-पाच लोक होते जे त्या माणसाला वाचवत होते. त्यापैकी एकाकडे कोणतेही साधन नव्हते आणि त्याने त्याच्या हातांनी कारची खिडकी फोडली, संपूर्ण रक्तस्त्राव झाला. नंतर, आम्ही अग्निशमन दलाच्या गाडीची वाट पाहिली आणि कारची खिडकी कापण्यासाठी कटर वापरला आणि त्यानंतरच आम्ही त्या माणसाला वाचवू शकलो.”
advertisement
"जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा चालकाचा मृत्यू झाला होता आणि त्यांची ओळख पटवणंही कठीण होतं. कारच्या बाहेरील दरवाजाला इलेक्ट्रॉनिक लॉक होता, ज्यामुळे अपघातादरम्यान ते उघडणे अशक्य झालं. घटनास्थळावरील इतर चालकांनी सांगितलं की, Xiaomi SU7 चा अतिवेगामुळे अपघात झाला आणि विरुद्ध लेनमध्ये फेकला गेला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 10:15 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
EV कार घेताय सावधान! अपघातानंतर कारचं दार उघडलंच नाही, चालकाचा जळून कोळसा, घटनेचा VIDEO