Engineer झाला, तरी नोकरी सोडली अन् Momos विकू लागला; आज अवस्था बघाल तर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
एवढा जीव लावून अभ्यास केल्यानंतर, 4-5 वर्ष त्याच क्षेत्रात काम केल्यानंतर एका तरुणाने सारंकाही सोडून मोमोज विकावे...हे वाचायला जरी वेगळं वाटत असलं, तरी...
अरशद खान, प्रतिनिधी
देहरादून : नोकरी की व्यवसाय असं विचारल्यास कदाचित अनेकजणांचं उत्तर व्यवसाय असेल, कारण त्यात मनासारखं काम करता येतं आणि काहीही झालं तरी स्वत:ची सत्ता असते. परंतु यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी केवळ मेहनत नाही, तर क्रिएटिव्हिटी महत्त्वाची असते. आपल्या ग्राहकांना काय आवडेल याचा विचार त्यांच्याआधी आपण करणं आवश्यक असतं. अशाच एका तरुण व्यवसायिकाची Success story आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याने इंजिनीअरिंग सोडून थेट मोमोजचा स्टॉल सुरू केला.
advertisement
इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम मूळातच फार कठीण असतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच अवघड परीक्षा पार करावी लागते. त्यानंतर अनेक विद्यार्थी शिकत असतानाच इंजिनीअरिंग अर्ध्यात सोडतात. त्यांना तो अभ्यास झेपत नाही. तर अनेक बुद्धिमान विद्यार्थी यशस्वीपणे हा अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र एवढा जीव लावून अभ्यास केल्यानंतर, 4-5 वर्ष त्याच क्षेत्रात काम केल्यानंतर एका तरुणाने सारंकाही सोडून मोमोज विकावे...हे वाचायला जरी वेगळं वाटत असलं, तरी ही आहे राजची यशोगाथा.
advertisement
राजने सांगितलं की, मेकॅनिकल इंजिनीअरिंग करून त्याने त्याच क्षेत्रात नोकरी केली. परंतु कामात त्याचं अजिबात मन रमायचं नाही, ते काम त्याला करावंसंही वाटायचं नाही. मग त्याने सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये नशीब आजमवून पाहिलं. त्यानंतर काही वर्ष सॉफ्टवेयर इंजिनीअरिंगचा अनुभव घेतला. मात्र कधीच त्याच्याकडून मनासारखं काम झालं नाही, त्याचं सगळं लक्ष कायम फूड इंडस्ट्रीकडे असायचं. शिवाय त्याला मनासारखे पैसेही मिळत नव्हते. त्यामुळे अखेर त्याने निर्णय घेतला आणि नोकरीला राम राम ठोकला. मग त्यानंतर मात्र क्षणाचाही विलंब न लावता, कोणताही विचार न करता त्याने देहरादूनमध्ये फास्टफूड स्टॉल सुरू केला.
advertisement
राज सांगतो की, त्याच्या स्टॉलवर भरमसाठ मेन्यू नाही, मात्र जे पदार्थ आहेत त्यांची चव परफेक्ट आणि क्वालिटी बेस्ट असते. momos.com असं त्याच्या स्टॉलचं नाव. तिथे मोमो, चाऊमीन, स्प्रिंग रोल, चिली पोटॅटो, मंच्युरियन आणि सूप मिळतं. 30 ते 100 रुपये अशी एका प्लेटची किंमत असल्यामुळे ग्राहकांना हे स्टॉल पॉकेट फ्रेंडली वाटतं. उत्कृष्ट चव आणि कमी किंमतीमुळेच इथे ग्राहकांची कायम गर्दी असते. आता या व्यवसायातून राज आनंदाचं आयुष्य जगतोय.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
view commentsLocation :
Dehradun,Uttarakhand
First Published :
February 21, 2024 6:46 PM IST


