22 लाखांच्या नोकरीत मन लागेना; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मिळवलं यश
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बेंगळुरूतील ओरॅकल इंडिया लिमिटेड कंपनीने अंकिताला वार्षिक 22 लाख रुपयांचं पॅकेज दिलं.
आयएएस आणि आयपीएससारख्या जबाबदारीच्या पदावर नोकरी करणे, फार कठीण आहे. कारण, या अधिकाऱ्यांवर दिवस-रात्र अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यांना कधी राजकीय दबावाचा सामना करावा लागतो तर जनतेच्या रोषाचा. त्यामुळे फार कमी तरुण यूपीएससी परीक्षा पास करून ही जबाबदारी अंगावर घेतात. बहुतांश तरुण, आयआयटीमध्ये प्रवेश आणि नंतर भरघोस पगाराची नोकरी मिळवण्याचं ध्येय समोर ठेवतात. पण, काही तरुण असेही असतात ज्यांना पैशांपेक्षा लोकांची सेवा महत्त्वाची वाटते. त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी कराण्याची जिद्द असते. अशाच प्रेरणादायी व्यक्तींमध्ये आएएस अधिकारी अंकिता पनवार यांचा समावेश होतो.
अंकिता मूळच्या हरियाणातील जिंद जिल्ह्यात असलेल्या गोसेन गावातील रहिवासी आहेत. इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत त्यांनी 97.6 टक्के मिळवले. बारावी पूर्ण करून यूपीएससी आणि जेईई परीक्षेची तयारी सुरू केली. जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळवला. तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बेंगळुरूतील ओरॅकल इंडिया लिमिटेड कंपनीने अंकिताला वार्षिक 22 लाख रुपयांचं पॅकेज दिलं.
advertisement
दोन वर्षांची यशस्वी कॉर्पोरेट कारकीर्द असूनही, सरकारी सेवांबद्दलची आवड अंकिताच्या मनातून जात नव्हती. त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. यानंतर 2020 मध्ये अंकिता यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि 321वी रँक मिळवली. पण, त्यांचं ध्येय आणखी मोठं होतं. आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. 2022 मध्ये चौथ्या प्रयत्नात अंकिताने 28वी रँक मिळवली आणि आपलं आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
advertisement
अंकिता यांचं खासगी आयुष्यही खूप रंजक आहे. अलीकडेच हरियाणातील पंचकुला येथे त्यांच्या साखरपुडा पार पडला. एका खासगी समारंभात त्यांनी आयपीएस आयुष यादवसोबत साखरपुडा केला. आयुष हे नारनोल जिल्ह्याजवळील थाठवाडी गावचे रहिवासी आहेत. 2021 मध्ये 430वी रँक मिळवून ते आयपीएस अधिकारी झाले आहेत. आयुष आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले होते. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचं संगोपन केलं. त्यांनी एनआयटी कुरुक्षेत्र येथून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतलेली आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान अंकिता आणि आयुष यांची ओळख झाली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2024 7:08 AM IST


