Bank Jobs 2024 : SBI बँकेमध्ये 1497 पदांसाठी जम्बो भरती; 93,000 मिळणार पगार, अर्ज कसा करायचा?

Last Updated:

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या 1497 रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे.

(SBI BANK)
(SBI BANK)
मुंबई: तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. एसबीआयमध्ये 1400पेक्षा जास्त रिक्त पदं भरली जाणार आहेत. तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या 1497 रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. स्पेशालिस्ट केडर कॅटेगरी पदांसाठी रेग्युलर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती केली जाईल. यासाठी एसबीआयच्या https://sbi.co.in/ वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
एसबीआय एससीओ रिक्रूटमेंट 2024साठी, असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) पदासाठी उमेदवारांचं वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. तसंच इतर पदांसाठी वयोमर्यादा 25 - 30 वर्षं आहे. रिझर्व्ह कॅटेगरीतल्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.
advertisement
एसबीआय एससीओ रिक्रूटमेंट 2024 : एसबीआयमध्ये व्हेकन्सी
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - प्रोजेक्ट मॅनेजमेंट व डिलिव्हरी - 187
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन्स - 412
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - नेटवर्क ऑपरेशन्स - 80
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - आयटी आर्किटेक्ट - 27
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - इन्फॉर्मेशन सिक्युरिटी - 07
advertisement
असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) - 784
एसबीआय एससीओ रिक्रूटमेंट 2024 : अर्ज फी
एसबीआयमधल्या स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे. एसएसी/एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.
एसबीआय एससीओ रिक्रूटमेंट 2024 : शैक्षणिक पात्रता
एसबीआय एससीओ भरतीसाठी, उमेदवारांकडे कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग किंवा त्याच्या समकक्ष डिग्री असावी.
advertisement
किंवा एमसीए/एमटेक/एमएससी कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग ही पदवी घेतलेली असावी.
एसबीआय एससीओ रिक्रूटमेंट 2024 : किती मिळेल वेतन
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम्स) - बेसिक : 64820 - 2340/1 - 67160 - 2680/10 - 93960 रुपये
असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) - बेसिक : 48480 - 2000/7 - 62480 - 2340/2 - 67160 - 2680/7 - 85920 रुपये
मराठी बातम्या/करिअर/
Bank Jobs 2024 : SBI बँकेमध्ये 1497 पदांसाठी जम्बो भरती; 93,000 मिळणार पगार, अर्ज कसा करायचा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement