सरकारी नोकरीची मेगाभरती, बँक ते रेल्वे अन् शिक्षक ते Post office, कुठे आणि कसा करायचा अर्ज?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
प्राथमिक शिक्षक व असिस्टंट प्रोफेसर पदासाठीही भरती केली जात आहे. कुठे आहेत या नोकरीच्या संधी, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : भारतात सरकारी नोकरीसाठी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. जे शिक्षण घेतलंय त्याच क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच रेल्वे, प्राथमिक शिक्षक व असिस्टंट प्रोफेसर पदासाठीही भरती केली जात आहे. कुठे आहेत या नोकरीच्या संधी, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
बँक PO भरती
आयबीपीएस देशभरातील अनेक बँकांमध्ये पीओ म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती करणार आहे. उमेदवार आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. एकूण 4,455 पदांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन डिग्री असावी, त्यांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. ओबीसी व सामान्य कॅटेगरीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 850 रुपये आहे, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी ही फी 175 रुपये आहे.
advertisement
रेल्वेत तीन हजारांहून जास्त पदांसाठी भरती
आरआरसी डब्ल्यूसीआरमध्ये तीन हजारांहून जास्त पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती जबलपूरमधील वेस्टर्न सेंट्रल रेल्वेसाठी (RRC WCR) आहे. यात अप्रेंटिसशिपसाठी 3,317 जणांची नियुक्ती होईल. यात जेबीपी डिव्हिजनमध्ये1262 पदांसाठी, बीपीएल डिव्हिजन 824 पदं आणि कोटा डिव्हिजनमध्ये 832 पदांसाठी भरती होईल. इच्छुक व पात्र उमेदवार वेस्टर्न सेंट्रल रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे.
advertisement
हरियाणामध्ये प्राथमिक शिक्षकांची भरती
हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनने (HSSC) प्राथमिक शिक्षकांच्या 1,456 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे आहे.
इच्छुक व पात्र उमेदवार 12 ऑगस्ट 2024 पासून हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट hssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. फी भरण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट आहे.
advertisement
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती
हरियाणा लोकसेवा आयोगाने (HPSC) हरियाणाच्या उच्च शिक्षण विभागात अनेक विषयांसाठी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी (कॉलेज कॅडर) भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार एचपीएससीच्या athpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे. या भरती प्रक्रियेत 2,424 पदं भरली जाणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2024 12:45 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
सरकारी नोकरीची मेगाभरती, बँक ते रेल्वे अन् शिक्षक ते Post office, कुठे आणि कसा करायचा अर्ज?