सोशल मीडिया तर सोडाच, घरी स्मार्टफोनसुद्धा नाही, पण बस ड्रायव्हरची मुलगी राज्यात तिसरी, यश मिळाल्यावर म्हणाली...

Last Updated:

पलकचे वडील कोलकात्यात स्कूल बस ड्रायव्हर आहेत. याच पैशातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती इतकी साधारण आहे की पलककडे अँड्रॉईड मोबाईलसुद्धा नाही.

पलक कुमारी
पलक कुमारी
विशाल कुमार, प्रतिनिधी
छपरा : बोर्डाच्या परिक्षांचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो, असे म्हणतात. येथूनच बहुतांश विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थी जीवतोड मेहनत करुन मन लावून अभ्यास करतात. अनेक जण आर्थिक परिस्थिती अभावी, सोयी सुविंधाअभावी शक्य होईल त्या परिस्थितीतही कठीण परिस्थिती मेहनत करतात आणि चांगले गुण मिळवतात. अशाच एका चालकाच्या मुलीने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
advertisement
बिहार बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये छपरा येथील मुलीने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. पलक कुमारी असे या मुलीचे नाव आहे. सारण जिल्ह्याची मुलगी पलक कुमारीनेही पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. छपरा शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या एकमा परिसरातील धनाडीह गावात राहणाऱ्या पलक कुमारीने 486 गुण मिळवून बिहारमध्ये तब्बल तिसरा क्रमांक पटकावला आहे.
advertisement
घरी अँड्रॉइड फोनसुद्धा नाही
पलक ही हुसेपूर छपरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. पलकचे वडील कोलकात्यात स्कूल बस ड्रायव्हर आहेत. यातून जे पैसे मिळतात त्यातून ते आपल्या आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याच पैशातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती इतकी साधारण आहे की पलककडे अँड्रॉईड मोबाईलसुद्धा नाही. तिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला हेसुद्दा पलकला तिच्या गावातील एका भावाने दिली.
advertisement
अनोखा निरोप समारंभ, स्वत: SP नी सहभागी होतं केलं असं काम..., सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का
पलकचे घर शाळेपासून लांब आहे. त्यामुळे ती मावशीच्या घरी राहून अभ्यास करायची. तिच्या या यशानंतर तिच्या आईने सांगितले की, पलक लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिच्या अभ्यासामुळे आम्ही तिला कधीही कोणते काम सांगितले नाही. पलकला आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा आहे. यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असेल. याआधीही आम्ही तिला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आताही जोपर्यंत ती तिचे स्वप्न पूर्ण करत नाही, तोपर्यंत तिला शक्य ते सर्व सहकार्य करत राहू, असे त्या म्हणाल्या.
advertisement
दरम्यान, पलक कुमारीने तिच्या या यशानंतर लोकल18 सोबत बोलताना सांगितले की, ती चांगले गुण मिळवण्यासाठी तब्बल 6 ते 7 तास अभ्यास करायची. शाळेच्या अंतरामुळे तिला अभ्यासासाठी त्रास जाणवत होता. खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे तिने आपल्या आत्याच्या घरी जाऊन अभ्यास केला. ती म्हणाली, माझ्या या यशाचे श्रेय मला माझ्या पालकांना आणि शिक्षकांना द्यायचे आहे. सोबत माझ्या आत्यानेही मला खूप अनमोल सहकार्य केले. इतकेच नव्हे तर पालक आणि शिक्षकांनीही तयारीसाठी मेहनत घेतली आहे. माझे आयएएस होण्याचे स्वप्न असून मी यासाठी अजून मेहनत करायला तयार आहे, असे ती यावेळी म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
सोशल मीडिया तर सोडाच, घरी स्मार्टफोनसुद्धा नाही, पण बस ड्रायव्हरची मुलगी राज्यात तिसरी, यश मिळाल्यावर म्हणाली...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement