कला शाखेतून बारावी झालीये? मग हे करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी ठरतील सर्वात बेस्ट

Last Updated:

कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकता ते जाणून घ्या. निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी माहिती इथे दिली असून, बारावीनंतर करिअरची दिशा ठरवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.  

कला शाखेतून बारावी केल्यावर ‘या’ क्षेत्रात करू शकता करिअर
कला शाखेतून बारावी केल्यावर ‘या’ क्षेत्रात करू शकता करिअर
केवळ मेडिकल आणि इंजिनीअरिंग या दोनच शाखांची निवड करण्याचे दिवस आता गेले. करिअरचे अनेक पर्याय आता उपलब्ध असतात. कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकता ते जाणून घ्या. निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी माहिती इथे दिली असून, बारावीनंतर करिअरची दिशा ठरवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
कला शाखेतून बारावी केली असेल, तर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. करिअरचा प्रश्न योग्य पद्धतीनं सोडवायचा असेल, तर या काही पर्यायांचा विचार केला पाहिजे.
बीए इन सोशिऑलॉजी
कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सोशिऑलॉजी अर्थात समाजशास्त्र विषयात पदवी घेऊ शकतात. देशातल्या अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये ही पदवी घेता येऊ शकते. बीए केल्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करून सहप्राध्यापक पदावर नोकरी करता येऊ शकते. तसंच काही एनजीओ व सरकारी विभागांमध्ये काम करता येऊ शकतं. शिक्षक म्हणून उत्तम करिअर करता येऊ शकतं.
advertisement
बीए इन इंग्लिश
कला शाखेतून बारावी केल्यानंतर इंग्रजी विषयात पदवी घेता येऊ शकते. पुढे पदव्युत्तर पदवी, पीएचडी करता येऊ शकते. सहप्राध्यापक पदावर काम करता येऊ शकतं. इंग्रजीवर प्रभुत्व असेल, तर भाषा क्षेत्रात वेगळं करिअरही करता येऊ शकतं.
advertisement
कला शाखेतली पदवी
कला शाखेतून बारावी केल्यावर त्याच शाखेत पुढे पदवी घेता येते. अलाहाबाद विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ अशा काही नामांकित विद्यापीठांमध्ये बीएफए हा अभ्यासक्रम शिकवला जातो. हा करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
बीए इन इकॉनॉमिक्स
अर्थशास्त्राची आवड असेल, तर विद्यार्थी त्यात पदवी घेऊ शकतात. पदवीच नाही, तर पुढे एमबीए आणि पीएचडी करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करता येऊ शकतो. सल्लागार म्हणूनही कंपन्यांमध्ये काम करता येऊ शकतं.
advertisement
बीए-एलएलबी
कला शाखेतून बारावी केल्यानंतर वकिली व्यवसायात उतरण्याचा एक पर्यायही उपलब्ध असतो. त्यासाठी बीए आणि मग एलएलबी ही पदवी घ्यावी लागते. देशातल्या अनेक विद्यापीठांमधून एलएलबी करता येऊ शकतं.
बॅचलर ऑफ मास मीडिया
पत्रकारिता, जाहिरात क्षेत्रात रुची असेल तर विद्यार्थी बॅचलर ऑफ मास मीडिया ही पदवी घेऊ शकतात. बारावीनंतर हा कोर्स करता येतो. विविध विद्यापीठांध्ये ही पदवी घेता येऊ शकते. त्यानंतर पदव्युत्तर पदवीदेखील घेता येऊ शकते.
advertisement
इव्हेंट मॅनेजमेंट
सध्याच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंटला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. यात रस असेल, तर बारावी केल्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करता येऊ शकतो. त्यादरम्यान इव्हेंट मॅनेजर, वेडिंग प्लॅनर यासाठीही अभ्यास करता येतो. अनेक मोठ्या कंपन्या इव्हेंट मॅनेजमेंट प्रोफेशनल्सच्या शोधात असतात. त्यामुळे उत्तम नोकरीही मिळू शकते.
बीए-एमबीए
बारावीनंतर विद्यार्थी एमबीए करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असतो. विविध विद्यापीठांमध्ये तो शिकवला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना CLAT परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. हे क्षेत्र खूप मोठं असून त्यात येण्याआधी विद्यार्थ्यांनी सर्व अभ्यासक्रमांची काळजीपूर्वक माहिती घ्यावी.
advertisement
एसएससी
बारावी केल्यानंतर एसएससी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांसाठी तयारी करता येऊ शकते. एसएससीकडून बारावीच्या पातळीवरील काही परीक्षा आयोजित केल्या जातात. त्याची अधिक माहिती वेबसाइटवर मिळू शकते.
बॅचलर इन फॅशन डिझायनिंग
फॅशन क्षेत्रात आवड असेल तर बारावीनंतर बॅचलर इन फॅशन डिझायनिंगचा कोर्स करता येऊ शकतो. विविध महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसंच बॅचलर इन फॅशन डिझायनिंगसाठी नीफ्टचा (NIFT) कोर्सही करता येऊ शकतो.
advertisement
बारावीनंतर भाषा, कायदा, फॅशन डिझायनिंग, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट अशा भरपूर क्षेत्रात करिअरचे पर्याय खुले होतात. योग्य माहिती घेतल्यास यात करिअरची उत्तम संधी उपलब्ध होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
कला शाखेतून बारावी झालीये? मग हे करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी ठरतील सर्वात बेस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement