CBI Sarkari Job: सीबीआयमध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची संधी! फक्त असावी ही डिग्री
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Sarkari Naukri CBI Recruitment 2024: केंद्रीय ब्यूरोमध्ये नोकरी मिळवायची असेल तर एक चांगली संधी आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.
मुंबई : सध्या तरुणाई सरकारी नोकरीच्या शोधात असते. तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मात्र यासाठी तुमच्याजवळ त्याविषयाची डिग्री असायला हवी. असं असेल तर केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे. सीबीआयने स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत आणि योग्य आहेत. ते याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करु शकतात. सीबीआयमध्ये या पदांसाठी अर्ज प्रकिया सुरु झाली आहे.
उमेदवार सीबीआयच्या या भरतीच्या माध्यमातून 15 मार्चपर्यंत किंवा त्यापूर्वी अप्लाय करु शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांजवळ एलएलबीची डिग्री असायला हवी. तुम्हीही सीबीआयमध्ये या पदांवर नोकरी करु इच्छित असाल तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचा. ज्या उमेदवारांची निवड या पदांसाठी होते, त्यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केलं जाईल.
advertisement
सीबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची योग्यता
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांच्याजवळ कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थानातून एलएलबीची डिग्री असायला हवी. यासोबतच उमेदवारांजवळ बार काउंसिलमध्ये विकलीच्या रुपात नामांकन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. यासोबतच सीबीआय भरती 2024 साठी योग्य होण्यासाठी उमेदवारांजवळ उच्च न्यायालयात गुन्हेगारी खटले हाताळण्याचा बीएआरमध्ये अनुभव असायला हवा.
सीबीआयसाठी असा करा अर्ज
सीबीआय भरती 2024 साठी आवश्यक योगता आणि अनुभव असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात.
advertisement
येथे पाहा अप्लाय करण्याची लिंक आणि नोटिफिकेशन
अशी होईल निवड
view commentsउमेदवारांनी अर्ज फॉर्म ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून भरला पाहिजे. ऑफलाइन आणि अखेरच्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही. केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच सीबीआयद्वारे इंटरॅक्शनसाठी बोलवलं जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 1:51 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
CBI Sarkari Job: सीबीआयमध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची संधी! फक्त असावी ही डिग्री


