भंगारातून घेतलं यंत्र अन् हमालानं उभारली कंपनी, आज लाखोंची उलाढाल, Video

Last Updated:

एक हमाल म्हणून काम करणारे अनिल शेळके आता कोट्यवधींच्या उद्योगांचे मालक आहेत.

+
भंगारातून

भंगारातून घेतलं यंत्र अन् हमालानं उभारली कंपनी, आज लाखोंची उलाढाल, Video

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणताही व्यक्ती आपली परिस्थिती बदलू शकतो. शून्यातून विश्व निर्माण करणारी काही उदाहणं आपण ऐकली असतील. असंच काहीसं उदाहरण धाराशिवमधील उद्योजक अनिल शेळके यांचंही आहे. एक हमाल म्हणून काम करणारा व्यक्ती आता कोट्यवधींच्या उद्योगांची मालक आहे. सुवर्णनील ऍग्रो प्रा. लि. ही कंपनी सुरू करून ते लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
advertisement
संघर्षमय प्रवास
अनिल शेळके यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची होती. 1993 मध्ये दहावीचं शिक्षण सुरू होतं. पण घरच्या हलाकीच्या स्थितीमुळे हमाल म्हणून काम सुरू केलं. एका दिवसाचा रोजगार 12 रुपये मिळू लागला. पण शिक्षण थांबवावं लागलं. येथूनच आयुष्यातील नव्या संघर्षाला सुरुवात झाली. वर्षभर हमाली केली. त्यानंतर भंगारातून एक मिरची कांडप यंत्र खेरदी केलं. त्यानंतर 1994 मध्ये प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला. पुढे अशी एका एका उद्योगांची साखळी सुरू झाली आणि परिस्थिती बदलली, असं शेळके सांगतात.
advertisement
सुवर्णनील ऍग्रो बनला ब्रँड
आता सुवर्णनील ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेळके यांनी अनेक व्यवसायात पदार्पण केले. त्यामधे पापड उद्योग, शेवया, पिठाची गिरणी, मका भरडा, बेसन पीठ प्लांट, त्यानंतर डाळ मिल व फूड सॉर्टेक्स अँड क्लीनींगचा व्यावसाय सुरु केला. सुवर्णनील ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुनील शेळके यांनी एक कोटी 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर त्यांना दर दिवशी पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता 10 हजार रुपयांचा नफा दर दिवशी शिल्लक राहतो, असे शेळके सांगतात. तर सुवर्णनीलच्या माध्यमातून 5 कामगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
advertisement
धान्य क्लिनींगसाठी साठी केवळ एक रुपया इतकाच दर आकारला जातो. व्यवसायात सुरुवातीपासूनच त्यांना पत्नीची आणि कुटुंबीयांची साथ मिळाली. त्यामुळे व्यवसायात भरभराट झाली. आता महिन्याकाठी तीन लाख रुपये कमवणारे अनिल शेळके कधीकाळी हमाली करीत होते. त्यामुळे आयुष्यात संघर्षाच्या जोरावर यशस्वी होता येत हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
भंगारातून घेतलं यंत्र अन् हमालानं उभारली कंपनी, आज लाखोंची उलाढाल, Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement