नापास झालेल्या विद्यार्थ्याची कहाणी, आता केंद्र सरकार देणार या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला तब्बल इतके रुपये

Last Updated:

गणित विषयाची आवड असल्याने संशोधन करायची इच्छा होती. मात्र, त्याच्या आयुष्यात एक घटना अशी आली, ज्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहणार होते. एमएससीच्या परीक्षेत तो नापास झाला.

सौम्य मित्तल
सौम्य मित्तल
मोहित शर्मा, प्रतिनिधी
करौली : जर मनात जिद्द असेल तर मग आयुष्यात कितीही संकटे असोत, व्यक्ती त्या सर्व संकटांवर, त्या परिस्थितीवर मात करत आपली स्वप्ने पूर्ण करतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. सौम्य मित्तल असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा जे केलं, ते सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सौम्य मित्तल त्याने पहिल्याच प्रयत्नात नेट जेआरएफच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आता नुकताच नेट जेआरएफ परीक्षा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सौम्य मित्तल या तरुणाने संपूर्ण भारतात गणित या विषयात 86 वी रँक मिळवली. त्याच्या या यशानंतर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
advertisement
आता ही परीक्षा पास केल्यानंतर सौम्य मित्तल या तरुणाला केंद्र सरकारच्या वतीने 5 वर्षांपर्यंत रिसर्च करण्याची संधी मिळणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीने 40 हजार रुपयांची स्कॉलरशिप 5 वर्षांपर्यंत मिळणार आहे. विशेष म्हणजे सौम्य मित्तल या तरुणाने फक्त 1 वर्षांच्या तयारीच्या जोरावर ही रँक मिळवली. हा राजस्थानच्या करौली परिसरातील मंडरायल येथील रहिवासी आहे. त्याचे वडील अशोक कुमार मित्तल आता नुकतेच तहसीलदार या पदावरुन निवृत्त झाले आहेत. तसेच त्याच्या आई या गृहिणी आहेत.
advertisement
त्याने सांगितले की, नेट जेआरएफ परीक्षा 2023 मध्ये दिली होती. त्यामध्ये गणित विषयात ऑल इंडिया रँक 86 मिळाली आहे. यासाठी त्याने जयपूरमध्ये राहून एक वर्षाचा क्लास केला होता. बीएससी आणि एमएससी केल्यानंतर त्याने बीएडचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर कॉलेज लेक्चरर बनण्याचे आणि रिसर्च करण्याचे त्याचे स्वप्न होते.
गणित विषयाची आवड असल्याने संशोधन करायची इच्छा होती. मात्र, त्याच्या आयुष्यात एक घटना अशी आली, ज्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहणार होते. एमएससीच्या परीक्षेत तो नापास झाला. मात्र, त्यावेळी त्याने त्याच्या सरांकडून मार्गदर्शन घेतले आणि एमएससी फायनलमध्ये जवळपास 85 टक्के मिळवले.
advertisement
प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळतील -
सौम्य याने सांगितले की, ही परीक्षा तुम्हाला दोन प्रकार पात्रता देते. पहिला प्रकार म्हणजे नेट आणि दुसरा प्रकार म्हणजे जेआरएफ. परीक्षेत उच्च रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जेआरएफ मिळते आणि कमी गुण मिळालेल्या लेक्चरर मिळण्यासाठी पात्र होतात.
advertisement
सौम्यने सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप दिली जाते. पहिल्या वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंत संशोधनासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. सध्या या स्कॉलरशिपचे प्रमाण 2 वर्षांपर्यंत 37 हजार रुपये इतके आहे. तसेच 2 वर्षांनंतर 42 हजार रुपये प्रतिमहिना इतकी ही स्कॉलरशिप दिली जाते.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
नापास झालेल्या विद्यार्थ्याची कहाणी, आता केंद्र सरकार देणार या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला तब्बल इतके रुपये
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement