'बजरंगी'ने केली पोलीस अधिकाऱ्याशी मैत्री, रोज येतो भेटायला, याठिकाणी दररोज नेमकं काय घडतं?

Last Updated:

एसएचओ देवेंद्र पांडेय यांनी या माकडाचे नामकरणही केले आहे. ते या माकडाला कधी बजरंगी तर कधी सुशीला या नावाने ओळखतात. त्याला नावाने हाक मारल्यावर ते माकड जवळ येते.

एसएचओ देवेंद्र पांडेय आणि माकड
एसएचओ देवेंद्र पांडेय आणि माकड
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : सध्या अयोध्येमध्ये एक पोलीस ठाणे खूप चर्चेत आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि एका माकडाच्या मैत्रीमुळे हे पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. पोलीस ठाण्याचे एसएचओ देवेंद्र पांडेय यांच्याजवळ दररोज एक माकड येते आणि त्यांच्या मांडीवर बसते, तर कधी खांद्यावर बसते. केसांनाही हात लावते. तसेच काही वेळा काही खाण्या-पिण्यासाठी इशाराही करते. मागील 4-5 महिन्यांपासून सातत्याने हे माकड याठिकाणी येत आहे. विशेष म्हणजे या माकडाची एक विशेषत: अशी आहे की, जेव्हा हे माकड काही खाते, तेव्हा देवेंद्र पांडे यांनाही खाऊ घालते.
advertisement
एसएचओ देवेंद्र पांडेय यांनी या माकडाचे नामकरणही केले आहे. ते या माकडाला कधी बजरंगी तर कधी सुशीला या नावाने ओळखतात. त्याला नावाने हाक मारल्यावर ते माकड जवळ येते. देवेंद्र पांडे यांनी सांगितले की, जेव्हापासून माझी नियुक्ती याठिकाणी झाली आहे, तेव्हापासून हे माकड माझ्याजवळ नियमित येते. मी नेहमी हनुमानजी यांची पूजा करतो. पंचमुखी हनुमान यांच्यावर माझी आस्था आहे. माझ्यावर असलेल्या हनुमानजी यांच्या कृपेमुळेच वानरराज माझ्याजवळ येतात.
advertisement
देवेंद्र पांडेय पुढे म्हणाले, आम्ही त्याचे नाव सुशिला असे ठेवले आहे. नावाने हाक मारल्यावर तो परत येतो. हनुमान जी अयोध्येचे राजा आहेत आणि कुठेतरी हनुमानजी यांची कृपा माझ्यावर आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली मानतो. जर मी भाग्यशाली नसतो तर प्रतिष्ठापनाच्या औचित्यावर मी याठिकाणी राहिलो नसतो. हनुमानजी यांनी मला अयोध्येत सेवा करण्याची संधी दिली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
advertisement
काय आहे धार्मिक मान्यता 
धार्मिक मान्यता अशी आहे की, माकडाला हनुमानाचे रुप मानले जाते. राम मंदिरासोबत माकडाचे अनोखे नाते आहे. भगवान रामललाच्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यावर रामललाच्या दर्शनासाठी माकड गर्भगृहापर्यंत गेले होते. याची माहिती राम मंदिर ट्रस्टनेही दिली होती. असे मानले जाते की, भगवान राम जेव्हा लंकेवर विजय मिळवल्यावर अयोध्येला परतले तेव्हा वानरसेनाही त्यांच्यासोबत अयोध्येला आली होती.
मराठी बातम्या/Viral/
'बजरंगी'ने केली पोलीस अधिकाऱ्याशी मैत्री, रोज येतो भेटायला, याठिकाणी दररोज नेमकं काय घडतं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement