inspiring story : शेतकऱ्याच्या पोरीची कमाल, मोबाईलपासून दूर, शेतात टॉर्च लावून अभ्यास, आता मिळवलं मोठं यश
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
मोनिका ही विकास बाल भारत उच्च माध्यमिक शाळेत शिकली. तिच्या या यशाबाबत तिने सांगितले की, मी हे यश मिळवण्यासाठी पूर्ण वर्षभर 6 ते 7 तास अभ्यास केला.
राहुल मनोहर, प्रतिनिधी
सीकर : आर्थिक परिस्थिती साधारण असली, सोयी सुविधा नसल्या तरी दुर्दम्य अशा जिद्दीच्या बळावर यश मिळवून एका शेतकऱ्याच्या पोरीने स्वत:ला सिद्ध केले आहे. मोबाईलपासून दूर राहून, शेतात टॉर्च लावून अभ्यास करुन या मुलीने आता जिल्ह्यात टॉपर येण्याचा मान मिळवला आहे. आज जाणून घेऊयात, तिच्या यशाची कहाणी.
मोनिका असे या मुलीचे नाव आहे. तिने दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत तब्बल 95.50 टक्के गुण मिळवले आहेत. मोनिका हा राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील पचार गावातील रहिवासी आहे. नुकताच राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल लागला. या परिक्षेत मोनिकाने हे घवघवीत असे यश मिळवले आहे.
advertisement
मोबाईलपासून राहिली दूर -
मोनिका ही विकास बाल भारत उच्च माध्यमिक शाळेत शिकली. तिच्या या यशाबाबत तिने सांगितले की, मी हे यश मिळवण्यासाठी पूर्ण वर्षभर 6 ते 7 तास अभ्यास केला. तर तिची आई तीजा देवी, ज्या गृहिणी आहेत, त्यांनी सांगितले की, अभ्यासादरम्यान, कधीही मोनिकाने मोबाईल फोनचा वापर केला नाही. तसेच कोणत्याही वेबसाईट किंवा ऑनलाईन क्लासचा वापर केला नाही.
advertisement
मोनिकाने नेहमी टीचरने शिकवलेल्या टॉपिक्सची पुन्हा पुन्हा उजळणी केली आणि परिक्षेत तिने हिंदीत 100, इंग्रजीत 69, विज्ञानात 96, सोशल सायन्समध्ये 90, गणितात 94 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळवले.
शेती राहून लाईटविना केला अभ्यास -
view commentsमोनिका हिचे कुटुंबीय शेती करतात. दररोज आपला अभ्यास झाल्यावर ती आपल्या कुटुंबीयांसोबत शेतीची कामंही पूर्ण करायची. अनेकदा लाईट नसताना तिने बॅटरी लॅम्प आणि टॉर्चच्या उजेडात आपला अभ्यास केला, असेही तिच्या आईने सांगितले. मोनिकाने सांगितले की, भविष्यात मला डॉक्टर बनायचे आहे. आता मी अकरावीच्या वर्गात बायोलॉजी घेणार आहे. तसेच सीकर जाऊन नीटची तयारी करणार आहे.
Location :
Sikar,Rajasthan
First Published :
May 30, 2024 9:49 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
inspiring story : शेतकऱ्याच्या पोरीची कमाल, मोबाईलपासून दूर, शेतात टॉर्च लावून अभ्यास, आता मिळवलं मोठं यश


